Sunday, March 1, 2026
Latest:
सोलापूर

राजकीय दबावातून जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यावर गुन्हा दाखल !!…

Spread the love

राजकीय दबावातून जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यावर गुन्हा दाखल !!…

पोलिसांनी खरी वस्तुस्थिती जनतेपुढे मांडावी!!!

दाखल करण्यासाठी पोलिसांवर कोणाचा दबाव???

सोलापूर (प्रतिनिधी)

सोलापुरातील एका शिवसैनिकाने एका जुन्या गाडी खरेदी विक्री करणाऱ्या एजंट कडून चार लाख रुपयाला गाडी घेतली होती त्या पोटी त्याला एक लाख रुपये ऍडव्हान्स दिला होता
उर्वरित रकमेचे गाडीवर कर्ज करून देऊ असे आश्वासन या एजंट ने दिले होते
एजंट कर्ज काढून देण्यासाठी टाळाटाळ करीत होता

त्यानंतर या शिवसैनिकांनी जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांची भेट घेऊन आपल्यावर झालेला अन्याय सांगितला

यावेळी मनीष काळजे यांनी या शिवसैनिकाला एक लाख परत देऊन तुझी गाडी घेऊन जा असा सल्ला संबंधित एजंटला दिला.
परंतु गुन्ह्यात असं म्हटलेलं आहे की मनीष काळजे यांनी गाडी घेतली. हे संपूर्णपणे साफ खोटे आहे वास्तविक पाहता मनीष काळजे यांच्याकडे स्वतःच्या चार नवीन फोर व्हीलर आहेत. या गाडी घेण्याचा काही संबंधच येत नाही…. परंतु हेतू परस्पर त्यांची बदनामी करण्याचा कट रचला गेला आहे…

यामुळे या प्रकरणात मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यावर दाखल केलेला गुन्हा राजकीय दबावातून दाखल झाला असून याची चौकशी व्हावी अशी मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे,चरण राज चौरे,
लोकसभा संपर्कप्रमुख महेश साठे,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आणि उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली आहे….

सोलापूर येथील विश्रामगृहावर सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आलेली असताना जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्वागताचे डिजिटल पोस्टर पोलीस व अतिक्रमण विभागांनी काढले होते. यावेळी
एका पोलीस अधिकाऱ्याचा व मनीष काळजे यांची प्रचंड वादावादी झाली होती. या प्रकरणाचा बातमी संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली होती. व हे प्रकरण मुख्यमंत्री महोदय पर्यंत गेले होते. त्याच अधिकारी यांनी हा गुन्हा त्यांच्या पोलीस स्टेशनला दाखल केला आहे.
राग मनात धरून वेळेची संधी साधून चुकीचा गुन्हा दाखल केला आहे असा आरोप शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

या प्रकरणाची संपूर्ण माहिती शिवसेनेचे सचिव संजय माशीलकर यांना दिली असून शिवसेना मनीष काळजे यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे
शिवसेना पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करून खच्चीकरण करण्याचे काम इथून पुढे सहन केले जाणार नाही असा इशारा जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी दिला आहे

प्रकरणातील काही कॉल रेकॉर्डिंग उपलब्ध असून लवकरच पत्रकार परिषद घेऊन.हे कट कारस्थान कोणी रचले. याचा चेहरा उघड करणार आहे.. या खोट्या गुन्ह्या ननंतरही पोलिसांकडून अजून गुन्हे दाखल करू अशा धमक्या पोलिसांकडून मिळत आहेत. असे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी सांगितले आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *