पाटकुल ते टाकळी सिकंदर या रोडवर खून
आदरपूर्वक सादर
▶️मोहोळ पोलीस ठाणे.गु.र.नं-521/2024.B.N.Sकलम 103(1)प्रमाणे
▶️ फिर्यादीचे व्यक्ति नाव व पत्ता – सुषमा विजयकुमार शिरसट.वय 35वर्ष रा. मसले चौधरी ता.मोहोळ जि.सोलापुर व
मोनं- 9699280645
▶️ आरोपीचे नाव – दत्ता वसेकर,रा टाकळी सिंकदर,मोहोळ
▶️गुन्हा घ.ता.वे.ठि.- दिनांक 11/08/24 रोजी सांयकाळी06:30 वा.चे। सुमारास दत्ता वसेकर यांचे हॉटेल जवळ टाकळी सिकंदर ते पाटकुल जाणारे रोडवर ता.मोहोळ
▶️ गुन्हा दाखल वेळ- 12/08/24 वेळ -02:28.
▶️ हकीकत- तरी वरील तारखेस वेळी ठिकाणी माझे पती घरातून जेवण खान करून चिंचोली तालुका पंढरपूर येथे जातो म्हणून मोटरसायकलने गेले रात्री आठ वाजताच्या सुमारास मला गावातील पोलीस पाटील यांनी फोन करून सांगितले की विजयकुमारला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले आहेत तुम्ही लवकर या असे सांगितल्यावर मी माझ्या घरातील सर्वजण आम्ही मोहोळ कडे निघालो मोहोळ येथील सरकारी हॉस्पिटल येथे आल्यावर माझे पती विजयकुमार शिरसट यांना पाहिले असता त्यांच्या अंगावरील कपडे रक्ताने माखलेले होते मी जवळ जाऊन पाहिले असता त्यांचे डोक्यात उभ्या बाजूला कोणत्यातरी हत्याराने मारून मोठी जखम केलेली दिसली त्यानंतर पोटावर बेंबीच्या वरील बाजूला पोटात भोसकलेली एक जखम दिसली त्यानंतर तिथे मला शामराव बंडगर व इतर लोकांकडून समजले की मौजे टाकळी सिकंदर येथे पाटकुल रोडवर असलेल्या दत्ता वसेकर यांनी त्याच्या हॉटेल जवळ माझ्या पतीला सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दत्ता वसेकर यांनी धारदार हत्याराने पतीच्या डोक्यात वार करून पोटात भोसवून खून करून पळून गेला आहे असे मला समजले म्हणून त्याच्या विरुद्ध माझी कायदेशीर तक्रार आहे.
▶️पोलीस ठाणे अंमलदार :- PSI कर्णेवाड
▶️ तपास – पोलीस निरीक्षक:-सुरेशकुमार राऊत सर
आदरपूर्वक सादर
पोलीस निरीक्षक
मोहोळ पोलीस ठाणे