Sunday, October 12, 2025
Latest:
सोलापूर

आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश :माढा तालुक्यातील २०८.२किलोमीटर रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा

Spread the love

आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश :

माढा तालुक्यातील २०८.२किलोमीटर रस्त्यांना प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा

प्रतिनिधी/-

माढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार अभिजीत पाटील यांचा विकास कामांच्या बाबतीत नेहमीच अग्रेसर असून मतदारसंघातील विविध पायाभूत सुविधांच्या प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करून त्यांचे समाधान करण्यासाठी त्यांची नेहमीच ओळख राहिली आहे.

नुकत्याच महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या आदेशान्वये माढा तालुक्यातील एकूण 208.2 किलोमीटर लांबीचे रस्ते दर्जोनित करून प्रमुख जिल्हा मार्गाचा दर्जा देण्यात आले आहेत.

या निर्णयामुळे आता या रस्त्यांच्या विकासासाठी शासनाकडून निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे माढा तालुक्यातील शेतकरी, व्यावसायिक, विद्यार्थी, रुग्ण तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या दळणवळणाच्या अडचणी मोठ्या प्रमाणात दूर होऊन सोयीसुविधेत वाढ होणार आहे.

या ऐतिहासिक निर्णयामुळे माढा तालुक्याच्या सर्वांगीण विकासाला नवी गती मिळणार असून, हा निर्णय हा केवळ रस्ते दळणवळणापुरता मर्यादित न राहता ग्रामीण भागातील सामाजिक-आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

दि. ३ सप्टेंबर २०२५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) पुणे मंडळाच्या प्रस्तावानुसार व जिल्हा परिषद सोलापूरच्या ठरावाच्या अधीन राहून शासनाने हा निर्णय घेतला असून त्यामुळे माढा तालुक्यातील रस्ते विकासाला मोठी गती मिळणार आहे.

या निर्णयामुळे –

  1. माढा तालुक्यातील महत्त्वाचे गावोगावचे रस्ते आता प्रमुख जिल्हा मार्गांत समाविष्ट झाले.
  2. रस्त्यांच्या दुरुस्ती, मजबुतीकरण व नव्याने होणाऱ्या विकासकामांसाठी निधी मिळण्यास प्राधान्य.
  3. शेतकरी, व्यावसायिक, विद्यार्थी व ग्रामस्थांच्या दैनंदिन प्रवासाला सोयीसुविधा.

एकूण 4749.170 कि.मी. प्रमुख जिल्हा मार्गांच्या यादीत सोलापूर जिल्ह्याचा समावेश.

आ.अभिजीत पाटील म्हणाले;
माढा तालुक्याचा शाश्वत विकास हाच माझा ध्यास आहे. शासनाच्या स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून मिळवलेला हा निर्णय माढा तालुक्याच्या जनतेसाठी एक मोठा टप्पा आहे. या रस्त्यांवर दर्जेदार विकासकामे करून नागरिकांना सोयीस्कर प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याचा माझा प्रयत्न राहील.”

“माझ्या मतदारसंघातील लोकांच्या सोयीसाठी रस्ते हा विकासाचा कणा आहे. शासनाने दिलेला हा दर्जा केवळ रस्त्यांपुरता मर्यादित नसून, तो माढा तालुक्यातील आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक विकासाचा नवा मार्ग मोकळा करणारा ठरणार आहे. यासाठी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री, सोलापूर पालकमंत्री जयकुमार गोरे आणि अधिकारी वर्ग व शासनाचे मनःपूर्वक आभार..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *