Thursday, January 15, 2026
Latest:
शेती विषयी

पांडुरंग निघाले संत सावता माळींच्या भेटीला” — संतपरंपरेचा अद्वितीय सोहळा

Spread the love

“पांडुरंग निघाले संत सावता माळींच्या भेटीला” — संतपरंपरेचा अद्वितीय सोहळा

पहिल्यांदाच लोकप्रतिनिधींची उपस्थितीत पांडूरंग पालखीचे पंढरपुरातून प्रस्थान

आमदार अभिजीत पाटील यांचा दिंडीसोबत पायी चालत नोंदवला सहभाग
(पंढरपूर ते रोपळे पायी दिंडीत आमदार अभिजीत पाटील चालत नोंदविला सहभाग)
पंढरपूर /प्रतिनिधी

पांडुरंग निघाले संत सावता माळीच्या भेटीला या अभंगाप्रमाणे संत सावता माळी यांची कर्मभूमी असणाऱ्या माढा तालुक्यातील अरण या गावची आख्यायिका आहे. कामातच देव मानणाऱ्या कांदा, मुळा, भाजी आवघी विठाई माझी अशी ओळख असणाऱ्या संत सावता माळी यांच्या भेटीसाठी रविवारी कानड्या विठुरायाच्या पालखीचे अरणकडे प्रस्थान झाले.
हा सोहळा अध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
या सोहळ्याचा पहिला मुक्काम पंढरपूर ते रोपळे पर्यंत असतो यामध्ये लोकप्रतिनिधी म्हणून पहिल्यांदाच आमदार अभिजीत पाटील हे पांडुरंगाच्या पालखीसोबत आणि तमाम वारकरी भाविकांसोबत जय हरी विठ्ठल नामाचा जयघोष करत “कांदा,मुळा,भाजी अवघी विठाबाई माझी” म्हणत पालखीत पायी चालत सामील झाले होते.

दि.२०जुलै रोजी पंढरपूरहून संत शिरोमणी सावता माळी यांच्या अरण (ता. माढा) येथील समाधीस्थळाकडे दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पांडुरंगाची पालखी प्रस्थान ठेवून तीन दिवसांच्या पायी प्रवास केल्यानंतर २६ जुलै रोजी अरण येथे पोहोचणार आहे.
दरम्यान संत सावता माळी पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पारंपरिक भक्ती, श्रद्धा आणि सेवा यांचे प्रतीक असणारा हा अनोखा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडतो. या भक्तिसोहळ्यात माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिजीत आबा पाटील यांनी स्वतः पायी दिंडीमध्ये रोप्ळे येथे पहिला मुक्काम असून आमदार पाटील यांनी पालखीचे स्वागत करत पायी चालत आले.

याप्रसंगी बोलताना आ. अभिजीत आबा पाटील यांनी सांगितले की
“संत सावता माळी यांच्या जीवनमूल्यांचा वारसा आम्हा सर्वांच्या प्रेरणेसाठी आहे. लोकप्रतिनिधी म्हणून श्री पांडुरंग पालखीत उपस्थित राहणार असल्याचे सांगितले. अरण या संत भूमीत पांडुरंगाची पालखी येते ही आपल्या माढा तालुक्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. पालखी सोहळ्याच्या माध्यमातून ग्रामीण भागात भक्तीचा व सांस्कृतिक वारसा वृद्धिंगत होत आहे. हा सोहळा अधिक व्यापक करण्यासाठी पुढील वर्षांमध्ये शासनस्तरावरून आवश्यक त्या योजना राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.”

यावेळी वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर मंडळी, कीर्तनकार, स्थानिक भक्तगण, सावता परिषद पदाधिकारी, युवा कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *