सेवा पंधरवड्याचे आमदार अभिजीत पाटील यांची बैठक
सेवा पंधरवड्याचे आमदार अभिजीत पाटील यांची बैठक
प्रांताधिकारी, तहसीलदार,
छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत व ‘सेवा पंधरवडा’ उपक्रमाचा शुभारंभ पंढरपूर तालुक्यात उत्साहात
प्रतिनिधी/-
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिवस दि. १७ सप्टेंबर २०२५ ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती दि. २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या माध्यमातून समाजातील सर्व घटकांपर्यंत शासकीय योजना पोहोचवणे, लोकसहभाग वाढवणे आणि सेवाभावाची भावना रुजवणे हा उद्देश आहे.
पंढरपूर तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या पुढाकाराने माढा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार अभिजीत आबा पाटील यांच्या शुभहस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगोटे, भूमी अभिलेख विभागाच्या पूजा अवताडे, अ गटविकास अधिकारी विकास काळुंगे, अरुण भुजबळ, सरपंच सोमनाथ झांबरे, संचालक भागवत चौगुले, संजय खरात, नवनाथ नाईकनवरे, संदीप पाटील, विकास पाटीलशआदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीतषविवादग्रस्त अविवादग्रसत नोंदी निर्गत करणे. त्याबाबत कॅम्प राबवून शेतकऱ्यांपर्यंत पोचणे. दि. १७सप्टेंबर ते २ऑक्टोंबर २०२५पर्यंत विवादग्रस्त नोंदी १०% वर अविवादग्रस्त नोंदी ०.५% वर आणणे.
3.दि. 17 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानात सर्व गावांमध्ये 7/12 वाचन करणे.
4.गाव तिथे स्मशानभूमी अभियान अंतर्गत ज्या ठिकाणी स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध नाही तेथे बक्षीसपत्र वा ग्रामपंचायत मार्फत खाजगी जागा अथवा असल्यास शासकीय जागा उपलब्ध करुन देणे.
5.शासकीय जमीन land Bank Degitization (Update) करणे.
6.विविध जातीचे प्रलंबीत प्रमाणपत्र वाटप करणे.
7.कुणबी जातीच्या नोंदी शोधणे.अनुकंपा भरतीची कार्यवाही पूर्ण करणे.
8.VJNT जमातीसाठी विविध प्रकारचे दाखले देणेसाठी कॅम्प आयोजित करणे.
- 29 ऑगस्ट 2025 च्या शासन निर्णयानुसार पाणंद रस्ते अतिक्रमण मुक्त करणे. रस्ते अदालत आयोजन करणे अथवा त्याचे Geo tagging करणे, त्याबाबत कुठल्याही प्रकारचा वाद नाही अशा रस्त्यांची नोंद इतर अधिकारात घेणे.पाणंद रस्त्यांना क्रमांक देणे.
10.Third gender एकट्या महिला व आत्महत्याग्रस्त शेतकरी यांचेसाठी सर्व प्रकारच्या योजनांचा लाभदेण
11.ASSK केंद्र बंद असलेल्या ठिकाणी नवीन वाटप करणे.
- आयुषमान भारत कार्ड वाटप कॅम्प आयोजन करणे.
या उपक्रमात नागरिकांचे प्रश्न मार्गी लावणे, शासनाच्या विविध योजना प्रत्यक्ष लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, डिजिटल सेवांचे प्रसार, पायाभूत सोयींची अंमलबजावणी, तसेच वंचित घटकांपर्यंत सेवांचा लाभ मिळवून देणे या विविध उपक्रमांचा समावेश असेल.
याप्रसंगी आमदार अभिजीत पाटील म्हणाले की, “मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिवस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती हा कालावधी ‘सेवा पंधरवडा’ म्हणून साजरा करणे ही लोकसेवेची खरी संधी आहे. सप्ताह जरी संपला तरी ही योजना पुढे सुरू राहील. प्रत्येक गाव, प्रत्येक नागरिकांपर्यंत शासनाच्या योजना पोहोचवण्याचे काम प्रामाणिकपणे व्हावे हीच अपेक्षा आहे. समाजातील सर्व घटकांचा सक्रिय सहभाग हेच या अभियानाचे बळ आहे.” रस्ते अतिक्रमण 31 डिसेंबर पर्यंत संपवावी. जिल्हा परिषद शाळांमध्ये शौचालय नाहीत अशांनी संबंधित विभागाला डिसेंबर अगोदर कळवावे. शासकीय जमिनीची माहिती एकत्रीकरण करून प्रस्ताव तयार करण्यात यावे असे बोलताना आमदार अभिजीत पाटील म्हणाले.