पाठकळ येथील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांशी संवाद…! आमदार समाधान आवताडे
पाठकळ येथील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांशी संवाद…!
📍 पाठकळ, मंगळवेढा
मंगळवेढा तालुक्यातील पाठकळ येथे झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि ग्रामस्थ मोठ्या अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकरी व नागरिकांशी प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांची व्यथा ऐकली. शेतातील उभ्या पिकांचे नुकसान, घरांचे झालेले नुकसान तसेच जनजीवनावर आलेले संकट याबाबत सविस्तर चर्चा करून परिस्थितीची माहिती घेतली.
या संवादादरम्यान शेतकऱ्यांना सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे याची ग्वाही दिली. पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. अशा संकटाच्या काळात शेतकरी व नागरिकांना दिलासा देणे हीच खरी जबाबदारी आहे, या विश्वासाने राज्य सरकार सर्वतोपरी मदत करण्यास कटिबद्ध आहे.
