Thursday, January 15, 2026
Latest:
सोलापूर

शिक्षण संकुल मध्ये ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरामोहोळ येथे दि. १७ मार्च २०२५ रोजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा करण्यात आला

Spread the love

श्रद्धा शिक्षण संकुल मध्ये ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा
मोहोळ येथे दि. १७ मार्च २०२५ रोजी ग्रॅज्युएशन डे जल्लोषात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाची सुरुवात सरस्वतीच्या प्रतिमेच्या पूजनाने व दिपप्रज्वलाने झाली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी यशवंत गुंड हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रणजित चवरे होते व प्रमुख उपस्थिती म्हणून संस्था सचिव सुनील झाडे हे होते.
या कार्यक्रमांमध्ये गुणवंत विद्यार्थी कौतुक सोहळा व वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ याचे आयोजन करण्यात आले होते. शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या दृष्टीने शाळेमध्ये अनेक विविध स्पर्धा परीक्षांचे नियोजन करण्यात आले होते. त्यामध्ये आय टी एस ,स्कॉलरशिप , अबॅकस, जीटी ग्रामर , ग्रेड या स्पर्धां घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना मानाची ट्रॉफी, गोल्ड मेडल व प्रमाणपत्र देऊन उपस्थित मान्यवरांचा हस्ते गौरविण्यात आले. तसेच त्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अथक परिश्रम घेतलेल्या सर्व शिक्षकांना बुके देऊन सन्मानित करण्यात आले. त्यामध्ये अमृता बाबर, प्रियंका बंडगर, मीनाक्षी माने, तसलीम मुल्ला, प्रियंका सोंडगे, अश्विनी जाधव, तृप्ती कदम, सोनाली माळी, संगीता राऊत, स्नेहा जानराव, अर्चना पाचपुंड यांना सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे यशवंत गुंड यांनी मार्गदर्शनपर आपले मनोगत व्यक्त केले .
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता आरबळकर यांनी केले तर आभार प्रदर्शन मोहिनी थोरात यांनी मानले. या कार्यक्रमाला संस्था संचालक मोहित झाडे, प्रथमेश झाडे , सीईओ सृष्टी झाडे, व्यवस्थापक मिलन ढेपे, मुख्याध्यापिका वीणा कदम, मुख्याध्यापक फुलचंद साळुंखे, शाळा विभाग प्रमुख प्राजक्ता आरबळकर, समन्वयक पोर्णिमा सुरवसे, रूपाली कोकाटे, मोहिनी थोरात, सांस्कृतिक विभाग प्रमुख विद्या पवार हे उपस्थित होते. तसेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *