मोहोळ रेल्वे स्टेशन येथे सिद्धेश्वर एक्सप्रेस, हुतात्मा एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, चेन्नई मेल रेल्वे गाड्यांना कोरोना काळापासून बंद पडलेला थांबा परत एकदा कायमस्वरूपी थांबा चालू व्हावा:- भाजपा मोहोळ विधानसभा
मोहोळ रेल्वे स्टेशन येथे सिद्धेश्वर एक्सप्रेस, हुतात्मा एक्सप्रेस, इंद्रायणी एक्सप्रेस, चेन्नई मेल रेल्वे गाड्यांना कोरोना काळापासून बंद पडलेला थांबा परत एकदा कायमस्वरूपी थांबा चालू व्हावा, या मागणी करता चेंबर ऑफ कॉमर्स, मोहोळ व भाजपा मोहोळ विधानसभेच्या च्या वतीने भारत सरकार, रेल्वेमंत्री, माननीय ना.श्री. अश्विनी वैष्णव साहेब यांना शिफारस होण्याकरिता महाराष्ट्र राज्य, सहकार व पणन, माजी मंत्री माननीय आ.सुभाष (बापू) देशमुख , सोलापूर जिल्हा माजी पालकमंत्री माननीय आ.विजयकुमार (मालक) देशमुख , भाजपा जिल्हाध्यक्ष मा.आ. सचिन (दादा) कल्याणशेट्टी व रेल्वे ऑफिस सोलापूरचे प्रमुख डी. आर. एम. मा.सुजित मिश्रा साहेब यांना चेंबर ऑफ कॉमर्स चे पदाधिकारी व भाजपा पदाधिकारी यांनी समक्ष भेट घेऊन या गाड्यांना थांबा लवकरात लवकर चालू व्हावा याकरता निवेदन देऊन चर्चा केली.
यावेळी तिन्ही आमदार साहेबांनी या शिष्टमंडळास सकारात्मकता दर्शवत, येणाऱ्या काळामध्ये आम्ही तुमच्यासोबत समक्ष येऊन दिल्ली येथे केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्यासोबत आपली बैठक लावून हा प्रश्न मार्गी लावण्याकरिता शाश्वत केले.
चेंबर ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी शहराची भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्या, व्यापाऱ्यांच्या यामुळे होणाऱ्या अडचणी, या भागात रेल्वेनी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या तसेच श्री नागनाथ महाराज तीर्थक्षेत्र, वडवळ व मोहोळ साठी दर्शनास येणाऱ्या भक्तांची होणारी अडचण अशा सर्व गोष्टी सविस्तररित्या सांगितल्या.
भाजपा मोहोळ विधानसभा पदाधिकाऱ्यांनी ही यावेळेस कोरोना काळापासून रेल्वे थांबा बंद झाल्यापासून तात्कालीन खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामीजी यांच्याकडे केलेल्या पाठपुरावा त्याचसोबत खासदार साहेबांनी ही केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे केलेल्या मागणी व या मागणीबद्दल सध्या असलेली परिस्थिती या सर्व बाबी आमदार महोदय व डीआरएम साहेब यांना सांगितल्या.
मोहोळ येथील चेंबर ऑफ कॉमर्स, राजकीय सर्व पक्ष व सामाजिक संघटनेच्या वतीने तत्काल ही मागणी मान्य न झाल्यास ज्या प्रकारे अनगर अप्पर तहसील कार्यालयाच्या विरोधात जन आक्रोश आंदोलने झाली. त्याच पद्धतीने या ही विषयात मोहोळमध्ये उग्र प्रकारची आंदोलने केली जातील, याला संपूर्णपणे रेल्वे प्रशासन जबाबदार राहील, असे सोलापूर रेल्वे ऑफिस चे प्रमुख डीआरएम साहेबांना या शिष्टमंडळाच्या वतीने सांगण्यात आले.
या शिष्टमंडळामध्ये चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष मा. प्रवीण डोके, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष तथा नगरसेवक मा. सुशील क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष मा. सतीश काळे, मा.मुजीब मुजावर, मा.आकाश फाटे, मा.उमर शेख, मा.सागर लेंगरे, मा.बाळासाहेब क्षीरसागर, मा.अजय कुर्डे,मा.आबासाहेब जाधव, मा. मन्सूर इनामदार आदि उपस्थित होते.
त्यासोबत चेंबर ऑफ कॉमर्स मोहोळ च्या वतीने काही दिवसांपूर्वी राज्यसभा खा.धनंजय महाडीक, खा.प्रणितीताई शिंदे, आ.राजाभाऊ खरे, मा.दीपक गायकवाड, मा.संजय क्षीरसागर, मा. उमेश पाटील, मा.विजयराज डोंगरे, मा.सीमाताई पाटील, मा.चरणराज चवरे, मा.रमेश बारसकर आदि लोकप्रतिनिधी व नेते मंडळींना या विषयात लक्ष घालण्याकरिता विनंती केली असता याही सर्वांनी सकारात्मकता दर्शवत आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे आश्वासन दिले आहे.