चोरीच्या तपासात १३ गाईंना हुडकण्यात मोहोळ पोलिसांना यश. ८ आरोपी निष्पन्न. टीमला ३५ हजाराचे …..पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांची माहीती
मोहोळ (प्रतिनिधी )मोहोळ पोलिस ठाण्याने जिल्ह्यातील गोवंश चोरीच्या तपासात १३ गाईंना हुडकण्यात यश मिळाले आहे . यामध्ये ८ आरोपी निष्पन्न झाले असून ५ आरोपींना पकडण्यात आले आहे. त्या बद्दल त्या टीम ला ३५ हजारांचे रिवार्ड देण्याची घोषणा जिल्हा पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी मोहोळ येथे केली.
मोहोळ तालुक्यात शेतकऱ्यांच्या अतिशय जवळचा प्रश्न असलेली हि गंभीर समस्या निर्माण झाली होती . याविषयी अधिक माहिती की गेल्या ८ महिन्यापासून मोहोळ तालुक्यातील सारोळे, देगाव, ढोकबाभुळगाव, नजीक पिंपरी, शिरापूर, अर्जुनसोंड,पेनुर, खंडाळी, चिखली आदि ग्रामीण भागातील गावातून देशी गाय, जर्सी गाय, म्हशी आणि इतर गोवंश चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते आणि शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला होता. जिल्हा पोलीस प्रमुख शिरीष सरदेशपांडे यांनी यात गांभीर्याने लक्ष घातले आणि मालमत्ते विषयक गुन्हेविरोधी मोहीम उघडण्यात आली. त्यासाठी आवश्यक पथकाची नेमणूक करून तपासाला प्रारंभ करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाने इलेक्टॉनिक्स पध्दतीने संशयित इसमांवरती पाळत ठेवण्यात आली आणि त्यांच्या हालचालीवर नजर ठेवून त्यांना अटक करण्यात आली. यामध्ये आदर्श उर्फ पांडू दत्तात्रय चव्हाण वय २२ राहणार विस्थापित नगर पंढरपूर सध्या सांजा जिल्हा धाराशिव, अजय दत्तात्रय पवार वय २१,नेताजी मोतीराम पवार वय २३, श्याम उर्फ बबल्या सुनील पवार वय २३, भीमराव उर्फ बिंद्रा छगन पवार वय३८ सर्वजण राहणार सांजा जिल्हा धाराशिव यांना अटक करण्यात आली अद्याप तीन आरोपी फरारी आहेत त्यांचाही कसोशीने शोध घेतला जात असून लवकरच त्यांनाही अटक होईल असा विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक आणि व्यक्त केला.या कारवाईत एकूण १९जनावरांच्या चोरीचे गुन्हे उघड करण्यात आले.आणि त्यात अंदाजे ८ लाख ८० हजार रुपये किमतीच्या ११ जर्सी गाई, प्रत्येकी ६० हजार रुपये किमतीच्या पांढऱ्या रंगांची खिलारी व तांबूस रंगाची गाई, ७ लाख रुपये किमतीचा पांढऱ्या रंगाचा क्र एम एच २५ / पी १८८० टाटा योद्धा पिकअप असा एकूण १७ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ही धाडसी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडेयांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनात मोहोळचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, पोलिस उपनिरीक्षक प्रवीण साने आणि प्रशांत भागवत, पोहेकॉ .रणजीत भोसले, सचिन माने पो.कॉ.सिद्धनाथ मोरे अमोल जगताप, अजित मिसाळ, स्वप्नील कुबेर संदीप सावंत, सुनील पवार आणि सायबर पोलीस ठाण्याचे पो.हे.कॉ युसूफ पठाण यांनी ही कामगिरी बजावली .


