पवार साहेबांच्या सांगण्यावरून अनिल दादांसाठी इथे आलेय; सुप्रिया सुळे
पवार साहेबांच्या सांगण्यावरून अनिल दादांसाठी इथे आलेय; सुप्रिया सुळे
अनिल सावंत आमदार व्हावेत, ही पाडूरंगाची इच्छा: सुप्रिया सुळे
छत्रपती शिवाजी महाराज चौक, आठवडा बाजार स्थळ मंगळवेढा, या ठिकाणी आज रविवार दिनांक 17 नोव्हेंबला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची जाहीर सभा पार पडली.
पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अनिल सावंत यांच्या प्रचारार्थ ही सभा खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली होती.
या सभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत नाना देशमुख, इतिहासकार डॉ श्रीमंत कोकाटे, संतोष नेहतराव, पूनम अभंगराव, राजश्री ताड, वृषाली इंगळे, शुभांगी ताई, साधना राऊत, चारुशीला कुलकर्णी, पूर्वा ताई, अनिता पवार ,सुनंदा उमाटे , रेखा ताई, काजल भोरकडे, सुभाष भोसले, संदीप मांडवे, दामोदर देशमुख, राहुलशेठ शाह दत्ता भोसले, सुधीर भोसले, सुधीर अभंगराव आप्पासाहेब माने, चंद्रशेखर कोंडूभैरी, दादा पवार, आदी महाविकास आघाडीचे विविध पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
उपस्थितांशी बोलताना, खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, पवार साहेबांचा निरोप घेऊन मी इथे आली आहे. पवार साहेबांनी मला स्वतः अनिल सावंतांच्या प्रचारासाठी जा, असं सांगितले आहे. साहेब मुख्यमंत्री होण्याअगोदर, सोलापूरचे पालकमंत्री होते. त्यामुळे सोलापूरशी आमचे खास नातं आहे.
अनिल सावंत एक नवीन आणि पारदर्शक चेहरा म्हणून तुमच्या समोर आहेत.
हा देश कोणाच्या मर्जीने चालत नाही. हा देश फक्त बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावर चालतो. आमचे सरकार आल्यावर शेतकऱ्यांच्या शेतमालाला आम्ही पाच वर्ष हमी भाव देणार, हा आपला शब्द आहे. तुमच्या रोजच्या जीवनात लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढू देणार नाही.
अनिल सावंत हे पंढरपूर मंगळवेढाचे उमेदवार व्हावेत ही पांडुरंगाचीच इच्छा आहे. कारण ते एक माळकरीही आहेत. त्यांचे चिन्ह पाचव्या क्रमांकावर आहे. ‘पंढरपूर-मंगळवेढा’ या नावांमध्ये देखील पाचच अक्षरे आहेत. हा योगायोग कसा असतो. अनिल भाऊ, तुमची सावली म्हणून तुमच्या बाजूला उभा असेल.
भाजपचा एक खासदार म्हणतो, महिला महाविकास आघाडीच्या सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढा. त्यांचा बंदोबस्त करतो. मीच तुझा फोटो काढते, मीच तुझा कार्यक्रम करते असा सुप्रिया सुळे यांनी भाजप च्या एका खासदाराला ठणकावले.
लोकसभेनंतर या राज्यात सगळ्यात लाडकी बहीण मी आहे. ‘लोकसभेच्या अगोदर नव्हते त्यांनतर झाली. असा काही दणका दिला डायरेक्ट लाडकी बहीणच झाले’ असा टोला अजित पवार यांचे नाव न घेता लगावला.
अनिल सावंत म्हणाले, पवार साहेब आणि सुप्रिया ताई तुम्ही माझ्यावर जो विश्वास टाकला आहे, तो विश्वास आज सार्थ करून दाखवण्याची वेळ आली आहे. परिचारिकांच्या जीवावर आमदार झालेला व्यक्ती सांगतो, तीन हजार कोटींची कामे केली. गावात जायला व्यवस्थित रस्ता नाही. विकास फक्त कागदावर दिसतो. दुसरे आपल्या सहकार पक्षातले उमेदवार हे नेहमी नॉटरीचेबाल असतात.
15 वर्ष झाले मी उत्तमरीत्या साखर कारखाना चालवतोय. काहींना वडिलांची पुण्याई असताना कारखाना टिकवता आला नाही. पंढरपूर मंगळवेढा शहराची ओळख जागतिक पर्यटन शहर म्हणून व्हावी यासाठी मी प्रयत्न करणार. या भागातील प्रश्न कायमचे सोडवायचे असतील, तर महाविकास आघाडीचे सरकार निवडून आणणे आवश्यक आहे. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या पाच ते दहा हजार रुपये महिन्याला मिळतील असा रोजगार उपलब्ध केला जाईल आणि मराठा, धनगर आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचे काम केवळ पवार साहेब आणि महाविकास आघाडी सरकारच करेल असेही सावंत पुढे म्हणाले.
सुप्रिया ताई च्या सभेने पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघाचे संपूर्ण वातावरण ढवळून निघाले आणि कायकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले
