शिवाजी प्रशाला पाटकूलच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न!32वर्षांनी झाली सवंगड्यांची भेट!
शिवाजी प्रशाला पाटकूलच्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा संपन्न!32वर्षांनी झाली सवंगड्यांची भेट!
पाटकूल, तालुका-मोहोळ येथील शिवाजी प्रशालेच्या सन1991-92 दहावीच्या बॅचच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा आर्या रीट्रीट, पोखरापूर येथे दिनांक 2 जून रोजी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. याप्रसंगी या विद्यार्थ्यांना शिकवणारे गुरुवर्य प्रकाश कुलकर्णी ,भारत सवणे शिक्षकेतर कर्मचारी नागनाथ देशमुख व नाना पांढरे यांची विशेष उपस्थिती लाभली. याप्रसंगी सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजन करून ,गुरुजनांना विठ्ठल मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळेविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दहावीच्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांसाठी क्रमिक पुस्तकांचे संच मुख्याध्यापक श्री दत्तात्रय गावडे यांना सुपूर्द करण्यात आले. याप्रसंगी आरती काटीकर, महादेवी ढोले, जयश्री ऐवळे या विद्यार्थिनींनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब जाधव यांनी केले तर आभार हरी शेटे यांनी मानले .या संमेलनासाठी या बॅचचे डॉक्टर राजकुमार पवार, ग्रामविकास अधिकारी प्रदीप कुलकर्णी, संगणक अभियंता पुरुषोत्तम परदेशी ,प्रसिद्ध शेतकरी सतीश गोडाळे, लक्ष्मण वसेकर, यांच्यासह विविध क्षेत्रात यशस्वी कामगिरी बजावणारे 35 जण उपस्थित होते. सर्वांनी सुग्रास भोजनाचा आस्वाद घेतला, गप्पागोष्टी केल्या.
या स्नेह मेळाव्यासाठी सचिन देशमुख, सदानंद कोळी, दत्तात्रय गावडे, शिवाजी शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.



