एस.के.चव्हाण यांना राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणरत्न पुरस्कार प्रधान
एस.के.चव्हाण यांना राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणरत्न पुरस्कार प्रधान
बहुउद्देशीय संस्था व समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना शिक्षणरत्न पुरस्काराने केले सन्मानित
सोलापूर प्रतिनिधी (नेताजी शिंदे)
पंढरपूर तालुक्यातील सुस्ते येथील विद्यार्थी प्रिय तथा विवेक वर्धिनी विद्यालय पंढरपूर येथे कार्यरत असलेले शिक्षक तथा छत्रपती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पंढरपूरचे चेअरमन श्रीकांत.के चव्हाण यांची स्वर्गीय हरिचंद्र गायकवाड या सामाजिक संस्थेचा राष्ट्रीय स्तरावरील शिक्षण रत्न या पुरस्कारासाठी निवड झाली होती त्या राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्काराचे वितरण सेवानिवृत्त डीवायएसपी रघुनाथ जाधव ,दैनिक पुण्यनगरीचे उपसंपादक भरतकुमार मोरे,अखिल सरपंच परिषद सोलापूर जिल्हा अध्यक्ष आदिनाथ देशमुख,राष्ट्रीय कुस्ती वस्ताद बाबासाहेब शिंदे,लायझिंग ऑफिसर पिंपरी चिंचवड महानगरपालिका योगेश कडाळे, संस्थापक अध्यक्ष डॉक्टर फाळके शिक्षण संकुलचेडॉ.हरिदास फाळके, बार असोसिएशन पंढरपूरचे माजी अध्यक्ष ॲड.भगवान मुळे यांच्या उपस्थितीत निर्मल कुमार फडफुले सभागृह सोलापूर येथे श्रीकांत चव्हाण यांना राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार प्रधान करण्यात आला.
विवेक वर्धिनी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथील सहशिक्षक तथा सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर सुस्ते येथील रहिवासी असणारे व शेतकरी कुटुंबातील तसेच शिक्षक यापेशातून आपल्या वक्तृत्वाने आपले व्यक्तिमत्व गाजवणारे तसेच छत्रपती नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पंढरपूरचे चेअरमन श्रीकांत कालिदास चव्हाण यांनी गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर तालुक्यातील भोसे येथील स्वर्गीय हरिचंद्र गायकवाड ही बहुउद्देशीय संस्था समाजातील विविध उपक्रम राबविले. यामध्ये त्यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमा अंतर्गत मदतीचे हात पुढे केले तर अनाथ मुला-मुलींचे शिक्षण हे त्यांनी स्वखर्चातून पूर्ण केले. अशी उल्लेखनीय
कामे त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केल्याने त्यांच्या याकार्याची दखल घेऊन या संस्थेने त्यांना राष्ट्रीय स्तरावरील शिक्षणरत्न पुरस्कार प्रधान केला.
यावेळी आदर्श शिक्षक जमीर शेख, विक्रम गावडे ,विस्ताराधिकारी मोहोळचे प्रतापसिंह शेजाळ,अलिबागचे प्रदीप पाटील,पंढरपूर व मुंबई हायकोर्टाचे ॲड. दत्तात्रय सरडे,सोलापूर जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संघटक शहाजानभाई शेख, पंढरपूर कोटाचे ॲड. रमेश कोरके,हॉटेल तात्याचे संस्थापक हरिदास तळेकर, प्रगतशील शेतकरी हरिश्चंद्र तळेकर ,देवांकुर सामाजिक संस्था पुणे येथील अर्चनाताई मस्के आदी मान्यवर या पुरस्कारा प्रसंगी उपस्थित होते.
-०-
