मंगळवेढा तालुक्यातील भोगवटदार वर्ग ०२ च्या जमिनी वर्ग ०१ परावर्तित करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी सोबत लवकरच बैठक लावणार : खासदार प्रणिती शिंदे
👉 खासदार प्रणिती शिंदे यांचा तळसंगी, फटेवाडी गावचा दौरा
दिनांक, ०९ जून २०२५
🛑 मंगळवेढा तालुक्यातील भोगवटदार वर्ग ०२ च्या जमिनी वर्ग ०१ परावर्तित करण्यासाठी मा. जिल्हाधिकारी सोबत लवकरच बैठक लावणार : खासदार प्रणिती शिंदे
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी आज मंगळवेढा तालुक्यातील तळसंगी, आणि फटेवाडी या गावी भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
तसेच ग्रामस्थांचे निवेदने ही स्वीकारून त्यांच्या अडचणी लवकरात लवकर सोडविण्याची ग्वाही दिली.
यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, मंगळवेढा तालुक्यातील भोगवटदार वर्ग ०२ च्या जमिनी वर्ग ०१ परावर्तित करण्यासाठी जिल्हाधिकारी साहेबांशी चर्चा करून त्यासाठी विशेष बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू, घरकुल संदर्भामध्ये जागेचा प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठीही पाठपुरावा करू. तसेच मंगळवेढ्याचा पाण्याचा प्रश्न माझ्या जिव्हाळ्याचा असून त्यासाठी आपण मला साथ द्यावी. मी तुमच्यासोबत शासनाशी लढून, पाठपुरावा करून निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे. मंगळवेढाच्या प्रश्नासाठी मी कायमस्वरूपी तुमच्या सोबत राहीन अशी ग्वाही यावेळी दिली.
यावेळी सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, मंगळवेढा तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत साळे, शहराध्यक्ष राहुल घुले, युवक तालुकाध्यक्ष रविकिरण कोळेकर, तळसंगी चे जगन्नाथ बोराडे, माजी सभापती भारत मासाळ, फटेवाडी चे सरपंच काळुंगे ताई, प्रकाश काळुंगे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.



