खासदार प्रणिती शिंदे यांचा मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी व ममदाबाद (शे) गावभेट दौरा संपन्न शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळावी
🛑 खासदार प्रणिती शिंदे यांचा मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी व ममदाबाद (शे) गावभेट दौरा संपन्न
👉 शेतकऱ्यांना वेळेवर वीज मिळावी; वरिष्ठ अधिकाऱ्यांना आदेश
मंगळवेढा, दिनांक १२ सप्टेंबर २०२५
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी व ममदाबाद (शे) या गावांना भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला.
या वेळी बोलताना त्यांनी वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारावर तीव्र शब्दांत टीका केली. “शेतकऱ्यांना वेळेवर सिंगल फेज व थ्री फेज वीज उपलब्ध होत नसल्याने त्यांचे मोठे नुकसान होत आहे. हा अन्याय मी गप्प बसून सहन करणार नाही. तुमची लोकप्रतिनिधी म्हणून मी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलून तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्याचे आदेश दिले आहेत,” असे खासदार शिंदे म्हणाल्या.
गावकऱ्यांनी सांगितले की या भागात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालतो. सायंकाळी पाच ते आठ या वेळेत वीजपुरवठा बंद राहिल्याने शेतकऱ्यांना व जनावरांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. या समस्येवर उपाय करण्याचे आश्वासन खासदार शिंदे यांनी दिले. “इथून पुढे जर अशा प्रकारे अन्याय झाला तर तुम्ही मला कळवा, मी तुमच्यासोबत आहे,” असे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले.
गावभेट दौऱ्यात ग्रामस्थांनी विविध प्रश्न व विकासकामांच्या मागण्या मांडल्या. त्यासंदर्भातही लवकरच कार्यवाही करण्याचे आश्वासन खासदार शिंदे यांनी दिले.
या कार्यक्रमास तालुका काँग्रेस अध्यक्ष प्रशांत साळे, प्रदेश सचिव रवीकरण कोळेकर, शहराध्यक्ष राहुल घुले, माजी सभापती संभाजी गावकरे, गणेशवाडीचे आबासाहेब लांडे, सरपंच सौ. इंगोले, दत्तू सर तसेच ममदाबाद (शे) येथील भीमराव पाटील, बंडू जुंदळे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬



