शेतकऱ्यांची सक्तीची वसुली थांबवा, नव्याने पिककर्ज द्या – प्रणिती शिंदे यांची मागणी
🛑 शेतकऱ्यांची सक्तीची वसुली थांबवा, नव्याने पिककर्ज द्या – प्रणिती शिंदे यांची मागणी
सोलापूर जिल्हा आढावा समितीच्या बैठकीत खासदार प्रणिती शिंदे यांच्या वतीने बँकिंग संदर्भात निवेदन देण्यात आले.
सोलापूर, दि. १९ सप्टेंबर २०२५
आज जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत नियोजन भवन, सोलापूर येथे झालेल्या जिल्हास्तरीय आढावा समिती (DLRC) बैठकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील शेतकरी आणि नागरिकांच्या बँकिंग संदर्भातील विविध अडचणींवर खासदार प्रणिती शिंदे यांनी निवेदनद्वारे शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. पंढरपूर, मोहोळ, अक्कलकोट, मंगळवेढा, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी व नागरीकांच्या समस्या अधोरेखित करून त्यांनी बँक अधिकाऱ्यांना निवेदन दिले.
त्यामध्ये खासदार शिंदे यांनी पुढील महत्त्वाच्या मागण्या मांडल्या :
▪️ शेतकऱ्यांचा सिबिल स्कोअर न पाहता शासन धोरणानुसार कर्जवाटप करावे.
▪️ कर्जासाठी पाच एकर जमिनीची सक्तीची अट रद्द करावी.
▪️ शेतकऱ्यांना मागणीप्रमाणे पिककर्ज उपलब्ध करून द्यावे.
▪️ दत्तक बँका टाळाटाळ न करता तातडीने कर्ज मंजूर कराव्यात.
▪️ एका गावातील एखाद्याने कर्ज न फेडल्यास संपूर्ण गावाला कर्ज नाकारणे बंद करावे.
▪️ अतिवृष्टी व पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या वसुली थांबवावी.
▪️ रब्बी हंगामासाठी नवे कर्जवाटप करून शेतकऱ्यांना पेरणीस सक्षम करावे.
▪️ शेतकऱ्यांच्या मुला-मुलींना शैक्षणिक कर्ज व शिष्यवृत्ती मिळावी.
▪️ सक्तीच्या वसुलीमुळे आत्महत्या वाढत असल्याने सक्तीची वसुली थांबवावी.
▪️ शेतकऱ्यांना विहीर व सौर मोटारसाठी कर्ज व सबसिडी द्यावी.
▪️ आत्महत्याग्रस्त कुटुंबांना व कर्जबाजारी शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी.
▪️ OTS केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा कर्जवाटपात सहकार्य करावे.
▪️ शेतकऱ्यांना कर्जफेडीसाठी सवलत व नव्याने दिलासा देणारे निर्णय घ्यावेत.
खासदार शिंदे यांनी या निवेदनाद्वारे स्पष्ट केले की, सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीने कहर केला शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अनेक गावात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या गांभीर्याने सोडवल्या गेल्या नाहीत तर त्यांचे आर्थिक संकट अधिक वाढेल. त्यामुळे बँकांनी सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬