भाजपच्या फसव्या आश्वासनांमुळे सोलापूरकरांची पाण्यासाठी वणवण; काँग्रेसने खेळली कोरडी रंगपंचमी
भाजपच्या फसव्या आश्वासनांमुळे सोलापूरकरांची पाण्यासाठी वणवण; काँग्रेसने खेळली कोरडी रंगपंचमी*
सोलापूर शहरात रंगपंचमी हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र गेल्या पाच-सहा वर्षापासून सोलापूर शहर व जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होत आहे. शहरात चार ते पाच दिवसातून एकदा पाणी पुरवठा केला जात आहे. भाजपने सत्तेत येण्यापूर्वी 24 तास पाणीपुरवठा करण्याच्या आश्वासन दिले होते. मात्र सोलापूरकराची फसवणूक झाली असून पाणीटंचाईमुळे जनतेचे हाल होत असल्याचा आरोप करत काँग्रेसच्यावतीने शनिवारी कोरडी रंगपंचमी साजरी करण्यात आली.
सोलापूर शहर व जिल्ह्यावर पाणीटंचाईचे मोठे संकट आहे. शहरासह गावोगावी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. शहरात चार ते पाच दिवसातून एकदा पाणीपुरवठा केला जातो. भाजप सरकारने सत्तेत येण्यापूर्वी सोलापूरकरांना मुबलक पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र सोलापूरकरांचा पाणी प्रश्न अद्याप सुटलेला नाही. दुहेरी पाईपलाईनचा प्रश्न अद्यापही प्रलंबितच आहे. मात्र मागील दहा वर्षात भाजपने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केलेले नाही. त्यामुळेच जनतेचे भाजपने केलेल्या फसवणुकीकडे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने कोरडी रंगपंचमी खेळण्यात आली.
पाण्याचा अपव्यय टाळण्याचाही संदेश
सध्या शहर जिल्ह्यात पाण्याची भीषण टंचाई असून भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे पाण्याची वनवन होत आहे . शहर ग्रामीण भागात पिण्यास पाणी मिळत नसल्यामुळे सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीने आमदार प्रणिताताई शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेस भवन येथे पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी युवक काँग्रेस अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली कोरडी रंगपंचमी साजरा केली.
यावेळी प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर, उत्तर विधानसभा अध्यक्ष महेश लोंढे,शरद गुमटे,सुशीलकुमार म्हेत्रे, धीरज खंदारे,महेंद्र शिंदे, विवेक इंगळे,आशुतोष वाले, सुरज शिंदे,मनोहर चकोलेकर,अमित लोंढे,सोमनाथ होनराव, दिनेश डोंगरे, सचिन गायकवाड, चंद्रकांत नाईक उपस्थित होते.

