खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुर जिल्हा न्यायालय येथे भेट देऊन वकीलांच्या व कोर्टातील समस्या जाणुन घेतल्या
खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुर जिल्हा न्यायालय येथे भेट देऊन वकीलांच्या व कोर्टातील समस्या जाणुन घेतल्या
आज रोजी खासदार प्रणिती शिंदे यांनी १३/०८/२०२४ रोजी पदाधीकारी यांनी दिलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने सोलापुर जिल्हा न्यायालय येथे धावती भेट दिली यावेळेस:
वकीलांना व पक्षकारांना होणार्या पार्किंग ची समस्या बाबत जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन लवकरात लवकर प्रश्न सोडवु असे आश्वासन दिले.
जिल्हा व सत्र न्यायालयालयाच्या नविन ईमारतीचे रखडलेले काम तात्काळ बांधकाम बद्दल PWD अधिकारी यांच्याशी लवकरात लवकर काम चालु करावे अशी चर्चा केली.
वकिलांच्या चेंबर व बार असो हॉल मधील वीज बील हे कमरशीयल पध्दतीने न आकारता रेसीडेंशीयल पध्दतीने आकारणीबाबत.तात्काळ (MSEB)वीज वीतरण अधिकारी यांच्याशी चर्चा करुन लवकरात लवकर कमरशीयल कनेक्शन चे रुपांतर रेसीडेंशीयल करावे व त्या बाबत पाठपुरावा करावे असे सांगीतले.
वकिलांवर होणारे हल्ले थांबण्याकरिता व सरक्षणाच्या अनुषंगाने संसद अधिवेशनात वकिल सरक्षण कायदा लवकरात लवकर अमलात आणण्या करीता प्रयत्न व आवाज उठवणे बाबत आश्वासन दिले.
यावेळी सोलापुर बार असोशिएशन अध्यक्ष अध्यक्ष ॲड. अमित आळंगे,उपाध्यक्ष ॲड. व्ही. पी. शिंदे,सचिव ॲड. मनोज नागेश पामूल,सहसचिव ॲड. निदा सैफन,
खजिनदार ॲड. विनयकुमार कटारे तसेच जेष्ठ विधीज्ञ ॲड. व्हि.एस आळंगे,
ॲड. कोथिंबीरे, ॲड. सुतार, ॲड. विक्रांत फताटे, ॲड. परमानंद जवळकोटे, ॲड रफिक शेख , ॲड. शुभम माने, ॲड गुरव, ॲड भिमारांकर कत्ते, ॲड सहदेव भडकुंबे ॲड. बशिर शेख, ॲड शहानवाज शेख ॲड शिवाजी कांबळे, ॲड बसवराज स्वामी व इतर विधीज्ञ हजर होते.
