Thursday, November 27, 2025
Latest:
सोलापूर

माझ्या विजयात मोहोळ तालुक्याचा सिंहाचा वाटा, तुमचे ऋण फेडण्यासाठी माझे आयुष्य कमी पडेल, दहा वर्षात जे काम झाले नाही ते काम करायचे आहे, संसदेत शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणार :- प्रणिती शिंदे

Spread the love

माझ्या विजयात मोहोळ तालुक्याचा सिंहाचा वाटा, तुमचे ऋण फेडण्यासाठी माझे आयुष्य कमी पडेल, दहा वर्षात जे काम झाले नाही ते काम करायचे आहे, संसदेत शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणार :- प्रणिती शिंदे

🟣👉 मोहोळ तालक्यातील जनतेने प्रचंड बहुमत देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे, व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले

दिनांक:- १२ जून २०२४

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून प्रणिती शिंदे ह्या प्रचंड बहुमताने निवडून आल्याबद्दल मोहोळ तालुक्यातील जनतेचे, शेतकऱ्यांचे, महाविकास आघाडीचे नेते मंडळी पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मोहोळ तालुक्यातील श्रीराम. मंगल कार्यालय येथे कृतज्ञता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मोहोळ तालक्यातील जनतेने प्रचंड बहुमत देऊन विजयी केल्याबद्दल नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे, व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी आभार व्यक्त केले.

यावेळी बोलताना नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, ही निवडणूक जनतेने हातात घेतली होती. प्रचारासाठी वाड्या वस्त्यावर, गावा गावात गेले असता ४३ डिग्री उन्हात सुद्धा जनतेने उस्फुर्त प्रतिसाद दिला आणि मोहोळ तालुक्यातील जनतेने आशीर्वाद आणि सर्वात जास्त लीड देऊन, सिंहाचा वाटा उचलून मला प्रचंड बहुमताने विजयी केले. याबद्दल मोहोळ तालुक्यातील जनतेचे, शेतकऱ्यांचे, ऋण फेडण्यासाठी माझे आयुष्य कमी पडेल, त्याच बरोबर मनोज जरांगे पाटील साहेब यांचे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महाविकास आघाडी घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचेही आभार, हा विजय तुमचा आहे. या निवडणुकीत नेते एकीकडे जनता एकीकडे होती जनतेने ही निवडणूक हाती घेतली होती. साथ दिलेल्या प्रत्येक शेतकरी, मायबाप जनता या सर्वांना शेवटच्या श्वासापर्यंत मी साथ देईन, येत्या काही दिवसात शासकीय अधिकाऱ्यांना सोबत घेऊन तालुक्यातील प्रत्येक गावाला भेट देऊन जनतेच्या समस्या सोडविणार असल्याचे सांगितले. गेल्या दहा वर्षात जे काम झाले नाही ते सर्व कामे करायचे आहेत. संसदेत शेतीसाठी पाणी, चारा, दुधाला भाव, दुष्काळी परिस्थिती, हमी भाव यासारखे प्रश्नाबाबत आणि शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करणार असल्याचे ही यावेळी सांगितले.

या कृतज्ञता मेळ्याव्यास दिपक गायकवाड ,सुलेमान तांबोळी ,राजेश पवार ,अशोक भोसले, संजय क्षीरसागर, चेतन नरोटे, मनोज यलगुलवार, पवन गायकवाड ,मंगेश पांढरे ,सत्यवान देशमुख ,सुभाष पाटील ,शाहीन शेख ,सिमाताई पाटील ,मयुर खरात ,महेश देशमुख ,अरुण पाटील ,किशोर पवार ,सुरेश शिवपुजे ,राजशेखर पाटील ,विद्या कोळकुर ,रतन कसबे,बाळासाहेब डुबे ,भीमराव वसेकर ,निलेश जरग ,संग्राम चव्हाण ,भैरवनाथ भोसले,अजित जगताप ,आरिफ पठाण ,बालाजी लोहकरे ,मनोज धडके ,सिध्देश्वर वराडे ,महादेव जंवजाळ ,संतोष पाटील ,शरद गुंड पाटील ,कुमार गोडसे ,आशिश आगलावे ,बिरा खरात ,कृष्णदेव वाघमोडे ,बिलाल ,शेख ,दाजी कोकाटे ,लक्ष्मण भालेराव ,बाबुराव पाटील ,ज्ञानदेव कदम ,शाहीर काळे ,उत्तमराव मुळे ,उत्तम कदम ,दत्तात्रय सावंत ,बाबा गाडे ,विजय सावंत , ज्ञानेश्वर पाटील,प्रकाश गरड ,सुरेश हावळे ,उत्तरेश्वर आतकरे,बाळासाहेब आतकरे दिपक पालवे ,चेतन पाटील ,जगन्नाथ माने ,अतुल मोरे,प्रकाश जवंजाळ ,राजेंद्र सर्जे ,मधुकर आठवले ,महादेव सुरवसे ,संतोष गवळी,सुनिल पवार ,अमोल पवार ,शामराव पाटील ,दत्ता कदम ,देवीदास गायकवाड ,वसंत चव्हाण , डाॅ.झेंडगे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *