Sunday, October 12, 2025
Latest:
शेती विषयी

राजू खरे! केवळ राजू खरे नव्हे तर एक दिलदार आणि शब्दांचा पक्का असा हा माणूस, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ही म्हन सध्या राजू खरे यांना लागू होताना दिसून येते

Spread the love

राजू खरे! केवळ राजू खरे नव्हे तर एक दिलदार आणि शब्दांचा पक्का असा हा माणूस, बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ही म्हन सध्या राजू खरे यांना लागू होताना दिसून येते, या उलट काही लोकप्रतिनिधीना याचाही विसर पडतोय असा देखील प्रश्न काहींना पडतो, कारण राजकारणाच्या क्षेत्रामध्ये अनेक नेते,पुढारी मोठं-मोठ्या गप्पा गोष्टी करत जनतेला स्वपनातल्या गोष्टी रंगवून पुढे निघून जातात अन त्या बरोबर त्यांच्या गोष्टीही हवेत विरून जातात, पण राजकारणाच्या क्षेत्रात असेही माणसं आहेत की काल बोललो आणि आज कामाला सुरुवात होते, होय हे घडलेही तसंच, गेल्या महिन्यांतच मोहोळ मतदार संघातील व पंढरपूर तालुक्यातील सरकोली या गावांमध्ये विधानसभेचे संभाव्य उमेदवार शिवसेना नेते राजू खरे हे लोकांच्या भेटीगाठी घेत असताना काही स्थानिक नागरिकांनी गावामध्ये असलेल्या आई भवानीचं मंदिर बांधून देण्यात यावा यासाठी स्थानिक लोकांनी चर्चा करत निवेदन देण्यात आले, अन अवघ्या काही दिवसातच स्वखर्चातून काल रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास आई भवानीच्या मंदिराचा बांधकामास नारळ फोडत कामाला सुरुवातही झाले, ऐकणारे किंवा पाहणारे आश्चर्यचकित झाले, कारण राजू खरे यांना काल बोललो आणि आज लगेच कामाला सुरुवात झाली, हे पाहून इतर नागरिकही अवाक झाले, त्यामुळेच आश्वासनाची खैरात करणारे नेते नाही, तर ते शब्दांचा पक्का असणारे नेते असे म्हटले गेले, याचाच प्रत्यय संपूर्ण सरकोलीकरांनी उपस्थित राहुन अनुभवले, संपूर्ण राजकारणात राहून ‘माणूस’ पण जपत असलेले राजू खरे अनेकांच्या अडीअडचणीला धावून जात असताना दिसून येत आहे, राजकारणात राहून मुखवटा न लावणारे खूप कमी असतात अश्या अनेक प्रसंग तालुका पाहत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकत असल्याचं देखील बोलले जात आहे या कार्यक्रमावेळी जय मातोश्री पतसंस्थाचे चेअरमन रामहरी भोसले, कल्याण भोसले,शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष संतोष जाधव, शिवसेना उपतालुका प्रमुख उमाकांत करंडे, रंगनाथ गुरव, नेपतगावचे सरपंच पांडुरंग परकाळे, गोपाळपूर गावचे माजी उपसरपंच अरुण बनसोडे, ज्योतीराम गोडसे, संजय मस्के,समाधान बाबर,नवनाथ आसबे, चिंतामणी भोसले, राज दिघे,विनायक भोसले,संभाजी पवार,नागेश भोसले, अंबादास पवार, सिद्धेश्वर माने, ऋषिकेश दिघे,भाऊ शिंदे, सिद्धेश्वर लोखंडे-पाटील, अधिक कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *