मोहोळ तालुक्यातील मौजे ढोकबाभुळगाव येथील ग्रामदैवत श्री.यल्लमा देवीच्या यात्रेस सालाबाद प्रमा याहीवर्षी शुक्रवार दि.१३ डिसेंबर पासून मोठ्या उत्साही वातावरणात प्रारंभ
अंकोली, दि.८(दशरथ रणदिवे):- मोहोळ तालुक्यातील मौजे ढोकबाभुळगाव येथील ग्रामदैवत श्री.यल्लमा देवीच्या यात्रेस सालाबाद प्रमा याहीवर्षी शुक्रवार दि.१३ डिसेंबर पासून मोठ्या उत्साही वातावरणात प्रारंभ होणार असून यानिमित्ताने येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या यात्रेनिमित्त शुक्रवारी दि.१३ डिसेंबर रोजी रात्री ठीक साडे आठ वाजता पुजाऱ्याने मानकरी यांना रुकवत देण्याचा कार्यक्रम. शनिवारी दि.१४ रोजी दिवसभर आलेले यात्रेकरू व ग्रामस्थ आपला महानैवेद्य देवीस दाखवतात. याच दिवशी रात्री नऊ वाजता मानकरी यांच्याकडून पुजाऱ्यास रुकवत देण्याचा कार्यक्रम होणार आहे. याचदिवशी आठ वाजता प्रेक्षकांना करमणुकीचा म्हणून कोल्हापुरी लवंगी मिरची हा डी जे शो कार्यक्रम मोफत होईल. तसेच शोभेचे दारूकामही याच दिवशी होईल.तर रविवारी दि.१५ रोजी दुपारी बारा वाजता किच तुडविण्याचा कार्यक्रम व दुपारी दोन वाजता नामवंत मल्लांच्या जंगी कुस्त्याने या यात्रेचा समारोप होणार आहे.
याशिवाय यात्राकाळात दररोज संध्याकाळी देवाचा पालखी सह सवाद्य छबिना निघणार आहे.या यात्रेनिमित्त भाविकांना पिण्याच्या पाण्याची स्वतंत्र व्यवस्था ग्रामस्थांनी केली आहे.भाविकांना येण्या -जाण्यासाठी परिवहन महमंडळातर्फे एस. टी. बसेसची सोय करण्यात आलेली आहे. तरी या यात्रेचा भाविकभक्तानी लाभ घ्यावा असे आवाहन,ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.