संतोष राजगुरू यांची महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड


राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय नामदार श्री अजित दादा पवार यांच्या हस्ते श्री संतोष राजगुरू याना महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलच्या प्रदेश सरचिटणीस पदी निवड झाल्याचे पत्र देण्यात आले यावेळी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष व खासदार श्री सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी प्रदेश अध्यक्ष व सावता परिषद संस्थापक अध्यक्ष श्री कल्याण काका आखाडे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश युवक अध्यक्ष श्री सुरज चव्हाण, माजी खासदार श्री आनंद परांजपे व पक्षाचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर मान्यवर उपस्थित होते, या वेळी दादांनी निवडीचे पत्र देऊन सत्कार करण्यात आला व शुभेच्छा दिल्या आणि राज्यात जोरदार ओबीसी संघटन करावे असे सांगून श्री संतोष राजगुरू यांच्या संघटन कौशल्याचा फायदा नक्कीच पक्षाला होईल असा विश्वास व्यक्त केला आहे ।।। सावता परिषदेच्या माध्यमातून संतोष राजगुरू गेल्या 18 वर्षापासून या संघटनेच्या राज्य पातळीवर खूप जोमाने सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर ओबीसी समाजाचा काम करत आहेत संतोष राजगुरू यांचा सत्कार इंदापूर तालुक्याचे विकासरत्न आमदार माजी मंत्री दत्ता मामा भरणे यांनीही त्यांच्या निवासस्थानी बोलवून सत्कार केला आहे तसेच इंदापूर तालुक्याचे सुपुत्र मोहोळ तालुक्याचे विधानसभेचे आमदार यशवंत त्या माने साहेब यांनी त्यांचा सत्कार या ठिकाणी केला आहे संतोष राजगुरू च्या रूपाने त्यांना दिलेली राष्ट्रवादी काँग्रेसने ओबीसीसीच्या प्रदेश सरचिटणीस पदी केलेले निवड या निवडीमुळे ओबीसी समाजामध्ये खूप आनंदाचं वातावरण निर्माण झालेला आहे संतोष राजगुरू यांचे गेल्या अनेक निवडी झाल्यापासून प्रत्येक गावामध्ये सत्कारासाठी लोक त्यांना बोलवून त्यांचा सत्कार सन्मान करत आहेत आणि समाजाला एक विश्वास वाटतोय की या पदाला ते जरूर न्याय देतील