श्री एस के चव्हाण सर यांना राज्यस्तरीय शिक्षण रत्न पुरस्कार जाहीर
सुस्त/ प्रतिनिधी
सुस्ते तालुका पंढरपूर येथील विद्यार्थी प्रिय तसेच विवेक वर्धिनी विद्यालय पंढरपूर येथे कार्यरत असलेले शिक्षक श्री एस के चव्हाण सर यांना स्वर्गीय हरिचंद्र गायकवाड या सामाजिक संस्थेचा राष्ट्रीय शिक्षण रत्न या पुरस्कारासाठी निवड झाली आहे गेल्या अनेक दिवसांपासून भोसे तालुका पंढरपूर येथील स्वर्गीय हरिचंद्र गायकवाड ही बहुउद्देशीय संस्था समाजातील विविध उपक्रम राबवणाऱ्या व्यक्तींना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित करते आहे श्री एस के चव्हाण सर हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहेत त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना हा राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार या संस्थेच्या वतीने देण्यात आला आहे त्यांच्या निवडीबद्दल जिल्ह्यातून त्यांचे कौतुक होताना दिसून येत आहे.