आमदार राजाभाऊ खरेसाहेब यांचा शिवतीर्थ समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान.
आमदार राजाभाऊ खरेसाहेब यांचा शिवतीर्थ समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान.
तारापूर : मोहोळचे विद्यमान आमदार राजाभाऊ खरेसाहेब यांना मराठा समाज सेवा मंडळ सोलापूर संस्थेच्या वतीने शिवतीर्थ समाज भूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.आमदार राजाभाऊ खरेसाहेब यांचे मोहोळ मतदार संघातील सामाजिक शैक्षणिक व इतर समाज उपयोगी कामे लक्षात घेऊन मराठा समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष मनोहरजी सपाटेसाहेब यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.तारापूर येथील गंगाई सपाटे शिक्षण संकुलात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी राजाभाऊ खरे यांचा सन्मानपत्र, पदक,शाल,पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
आमदार राजाभाऊ खरेसाहेब यांनी केलेल्या विविध कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.यापूर्वी सुद्धा गंगाई सपाटे शिक्षण संकुलास त्यांच्यामार्फत प्रशालेतील विद्यार्थ्यांना बसण्यासाठी 200 बेंचेसचे वाटप करण्यात आले होते.त्याचबरोबर तारापूर,खरसोळी,पोहरगाव,विटे आदी गावात सुद्धा त्यांनी केलेल्या विविध विकास कामांची दखल यावेळी घेण्यात आली. राजाभाऊ खरेसाहेब यांनी या पुरस्काराला उत्तर देताना त्यांना देण्यात आलेल्या शिवतीर्थ समाजभूषण पुरस्काराबद्दल आभार व्यक्त केले.त्याचबरोबर त्यांनी केलेल्या विविध कामांची माहिती दिली. भविष्यात कोणत्या कामांना प्राधान्य दिले जाईल याबद्दल देखील त्यांनी यावेळी माहिती देऊन भविष्यात कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले.
या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन मुख्याध्यापक महंमद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मनोहरजी सपाटे,शरद बँकेचे चेअरमन महेश माने,तारापूर गावच्या सरपंच भारती ताई जगताप,माजी तंटामुक्ती अध्यक्ष बाळू काका सपाटे,हनुमंत सपाटे अजिंक्य सपाटे,प्रगतशील बागायतदार प्रदीप निर्मळ शिवसेना तुंगत गटप्रमुख नागनाथ देडगे लियाकत मुलाणी, तारापूर गाव तंटामुक्ती अध्यक्ष जालिंदर शेळके,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष महादेव माने आदी मान्यवर मंडळी उपस्थित होते.त्याचबरोबर प्रशालेतील सर्व विद्यार्थी पालक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.