क्रांति ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त नायगांव येथील कार्यक्रमास सोलापूर जिल्हा मधुन हजारो लोक जाणार असल्याची माहिती भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी दिली आहे.
क्रांति ज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंती कार्यक्रमानिमित्त नायगांव येथील कार्यक्रमास सोलापूर जिल्हा मधुन हजारो लोक जाणार असल्याची माहिती भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शंकरराव वाघमारे यांनी दिली आहे.
स्त्री शिक्षणाच्या जनक प्रथम शिक्षिका सावित्रीमाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नायगांव या गावी त्याचे भव्य स्मारक निर्माण व्हावे , तसेच तिथे महिला प्रशिक्षण केंद्र असावे अशी मागणी अनेक वर्ष समाजबांधव करत होते . आता या साठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या प्रयत्नामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 143 कोटी मंजूर केले आहेत. या कामाचे भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सभापती राम शिंदे, मंत्री पंकजा मुंडे, मंत्री अतुल सावे, मंत्री शंभूराज देसाई, मंत्री आदिती तटकरे, मंत्री जयकुमार गोरे, मंत्री छगन भुजबळ, मंत्री शिवेंद्र राजे भोसले , खासदार उदयन राजे भोसले, आमदार मनीषा चौधरी , आमदार योगेश टिळेकर , यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन समारंभ संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्हा मधुन सुमारे 100 एस टी बसेस तसेच शेकडो चार चाकी वाहनातून हजारो पुरुष आणि महिला निघणार आहेत . या कार्यक्रमासाठी माळी महासंघ, सावता परिषद , समता परिषद , माळी मिशन, क्रांती ज्योती परिषद , सकल माळी समाज आदी संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
चौकट
या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्यातून सावित्रीच्या लेकी प्रचंड मोठ्या संख्येने निघत आहेत , अनेक बसेस या फक्त महिलांच्या स्पेशल निघत आहेत
मोहोळ तालुक्यासह जिल्हा तील सर्व तालुक्यातील अनेक गावातून समाज बांधव मोठ्या संख्येने 3 जानेवारी रोजी नायगांव येथे पोहचत आहे. नायगाव येथील कार्यक्रमास यावेळी प्रचंड मोठ्या संख्येने सर्वच राजकीय पक्षांतील प्रमुख नेते उपस्थित राहत असल्यामुळे यावेळी होणारा कार्यक्रम भव्य असा होईल असा अंदाज आहे यामुळे काही वाहने ही दोन जानेवारी रोजी रात्रीच नायगांव कडे रवाना होत आहेत.
