Thursday, January 15, 2026
Latest:
सोलापूर

आईचं नातं न निभावता मुलीची मैत्रीण म्हणून प्रत्येक आईने वागलं पाहिजे-अंजलीताई आवताडे

Spread the love

 
आजच्या काळात युवा पिढीला समाज प्रबोधनाची खूप गरज आहे त्यातच मुलींमध्ये वयात येताना होणारे शारीरिक बदल, मानसिक बदल याबाबत पालकांनी जागृत राहत योग्य वेळी मार्गदर्शन केले पाहिजे. काय आयोग्य? काय योग्य ? हे त्या त्या वेळी मुलांना समजवले पाहिजे. मुलीच्या आईने केवळ आई हे नाते न निभावता मुलीची मैत्रीण म्हणून मुलीशी हितगुज केले पाहिजेत तरच युवा पिढीला योग्य मार्गदर्शन मिळणार आहे असे प्रतिपादन अंजलीताई समाधान आवताडे यांनी व्यक्त केले.त्या मंगळवेढा तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा येड्राव खवे येथे आयोजित केलेल्या किशोरी मेळाव्यामध्ये बोलत होत्या यावेळी व्यासपीठावर डॉक्टर प्रीती शिर्के, माजी समाज कल्याण सभापती शीलाताई शिवशरण, माजी सभापती प्रेरणा मासाळ, माजी सभापती प्रदीप खांडेकर,सुधाकर मासाळ, शिक्षणाधिकारी लवटे,क्रांतीताई आवळे,श्रावणी लेंडवे उपस्थित होते. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त या आश्रम शाळेमध्ये योगाचे प्रकार व प्रात्यक्षिके गीत मंच व्याख्या न पोस्टर्स स्पर्धा तसेच विविध रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते
पुढे बोलताना अंजलीताई अवताडे म्हणाल्या की,
सावित्रीबाई फुले यांनी त्या काळात जर स्त्री शिक्षणाचे योगदान दिले नसते तर आज महत्त्वाच्या पदावर दिसणाऱ्या स्त्रिया दिसल्या नसत्या,म्हणून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर करत प्रत्येक मुलीने शिक्षण घेतले पाहिजे.भारताच्या पहिल्या प्रशिक्षित स्त्री शिक्षिका म्हणून क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त बालिका दिन साजरा केला जात आहे प्रत्येक मुलीने सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून शिक्षणाचा पाया भक्कम केला पाहिजे
सावित्रीबाई फुले यांचे त्या काळात समाजाला फार मोठे योगदान आहे तालुक्यामध्ये प्रत्येक शाळेने किशोरी मिळावे आयोजित करून सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची महती मुलींसमोर मांडला पाहिजे,मुलींनीही समाजात ज्या घडामोडी घडत आहेत त्या घडामोडी संदर्भात पालकांशी चर्चा केली पाहिजे पालक जे योग्य म्हणतील तेच मुला मुलींनी ऐकले पाहिजे तरच आपणाला योग्य सल्ला व मार्गदर्शन मिळेल सध्या शासनाच्या अनेक योजना मुलींसाठी राबवल्या जात आहेत त्या योजना चा लाभ घेत मुलींनी चांगले शिक्षण घेऊन समाजात आदर्श निर्माण करावा असे आवाहन अंजली अवताडे यांनी बोलताना केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *