Thursday, January 15, 2026
Latest:
सोलापूर

विकास क्रांतीच्या मोठ्या पर्वासाठी आणखी एक संधी द्या- आ समाधान आवताडे

Spread the love

विकास क्रांतीच्या मोठ्या पर्वासाठी आणखी एक संधी द्या- आ समाधान आवताडे

तिसऱ्या दिवशीच्या प्रचार दौऱ्यात आ आवताडे यांचे गावोगावी जंगी स्वागत

प्रतिनिधी- पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात अनेक प्रलंबित विकास कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित विकास कामांची पूर्तता होण्यासाठी व विकास क्रांतीचे आणखी मोठे पर्व निर्माण करण्यासाठी आशीर्वाद रूपाने आणखी एक संधी द्या यापेक्षाही जोमाने आपली सेवा करुन दाखवेन असे प्रतिपादन भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार आमदार समाधान आवताडे यांनी निवडणुकीच्या प्रचारार्थ मंगळवेढा तालुक्यातील प्रचार ग्रामस्थांसमवेत सभा घेतल्या. सदरप्रसंगी मतदारसंघातील गावांसाठी केलेली विविध विकास कामे गावकऱ्यांना सांगून भाजप-महायुतीला मतदान करावे अशी विनंती केली.

मतदारसंघात रस्ते, वीज, शिक्षण, आरोग्य त्याचबरोबर मंडप बांधकाम, दलित वस्ती येथील संविधान भवन, सभामंडप बांधकाम, स्मशानभूमी संरक्षक भिंत बांधकाम इत्यादी कामे झाली आहेत. शिवाय विविध रस्ते सुधारणा तसेच जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणीपुरवठा सोय या कामांना भरघोस निधी मंजूर करुन अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. गेल्या ३वर्षात तालुक्यासह गावांचा झालेला विकास आणि महायुती सरकारने घेतलेले लोकहिताचे निर्णय गावकऱ्यांना सांगून भाजप-महायुतीलाच मत द्यावे अशी विनंती उमेदवार समाधान आवताडे यांनी केली.

तसेच श्रीमती रुख्मिणी दोलतोडे, सरपंच श्रीमती आरती कांबळे, दिपक भोसले, प्रदीप खांडेकर, शशिकांत चव्हाण, दत्तात्रय जमदाडे, अशोक चौंडे, राजेंद्र सुरवसे, संबंधित गावांचे सरपंच, उपसरपंच, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य आणि पदाधिकारी तसेच भाजप-महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *