सन 2024-25 चा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार श्री.महंमद शेख यांना जाहीर
सन 2024-25 चा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार श्री.महंमद शेख यांना जाहीर
श्री यशवंत शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर संचलित
श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य तथा मुख्याद्यापक स्काऊटर श्री. महंमद इलाही शेख यांना सन 2024-25 चा महाराष्ट्र शासनाचा “क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार”* जाहीर झाला आहे.
श्री.महंमद शेख यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्य करताना विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी नवनवीन उपक्रम राबविले आहेत.विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, चारित्र्य घडविणे व समाजाभिमुखतेची जाणीव निर्माण करण्याचे त्यांचे योगदान उल्लेखनीय मानले गेले आहे. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्याचा गौरव म्हणून हा राज्यातील शासनाद्वारे दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.शिक्षकांच्या अंगभूत गुणांचा सन्मान करणे व समाजनिष्ठ कार्याला प्रोत्साहन देणे या उद्देशाने शासनाकडून राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी हा बहुमान सोलापूर जिल्ह्यात मिळाल्याने अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
श्री महंमद शेख यांच्या अथक परिश्रम, सचोटी या कार्यामुळे संस्थेचा व सोलापूर जिल्ह्याचा गौरव झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
श्री. महंमद शेख यांनी नियमित अध्यापनासोबतच भारत स्काऊट व गाईड चळवळीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. मनमिळावू स्वभावामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमध्ये लोकप्रिय असलेल्या श्री शेख यांच्या या कामगिरीमुळे संस्था अभिमानित झाली आहे. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. मनोहर सपाटे , उपाध्यक्ष श्री. ज्ञानेश्वर सपाटे सचिव श्री.सुरेश जाधव,तसेच सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
