श्रद्धा इंग्लिश मीडियम 5 सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहात साजरा
“श्रद्धा इंग्लिश मीडियम 5 सप्टेंबर शिक्षक दिन उत्साहात साजरा”
आज दिनांक पाच सप्टेंबर रोजी श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूल मोहोळ येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिक्षक दिनाची सुरुवात डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन संस्थेचे संस्थापक सुनील झाडे , मिलन ढेपे ,मोहित झाडे ,धरती पाटील, मुख्याध्यापिका वीणा कदम ,कोऑर्डिनेटर पौर्णिमा सुरवसे यांच्या हस्ते करण्यात आले. सूत्रसंचालन अजित जाधव यांनी केले तर आभार महानंदा गाडे यांनी मानले. यामध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचा , शिक्षकांचा व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा गुलाब पुष्प देऊन यथोचित सन्मान केला , गुरुवंदना म्हणून एक नृत्य सादर केले त्याचबरोबर दोन विद्यार्थिनीनी गुंड नेत्रा व गोटे काव्यांजली यांनी भाषणे सादर केली . इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षक म्हणून सर्व वर्गामध्ये शिक्षकांची भूमिका पार पाडली. या पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता पाचवीचे वर्गशिक्षक अजित जाधव व सर्व विद्यार्थ्यांनी केले. हा कार्यक्रम पूर्णपणे यशस्वी होण्यामध्ये सर्व व्यवस्थापकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.