श्रद्धा शिक्षण संकुलाच्या शीरपेचात “आयकॉन्स ऑफ सोलापूर” या पुरस्काराने मानाचा तुरा
श्रद्धा शिक्षण संकुलाच्या शीरपेचात “आयकॉन्स ऑफ सोलापूर” या पुरस्काराने मानाचा तुरा
गजानन बहुउद्देशीय संस्था संचलित श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूल मोहोळ व श्रद्धा विद्या मंदिर मोहोळ या श्रद्धा संकुलाच्या शैक्षणिक कार्यक्षेत्रातील गुणवत्तेच्या आधारावर अवलंबून असलेली संस्था म्हणजे श्रद्धा शिक्षण संकुल यासाठी नवभारत नवराष्ट्र यांच्याकडून आयकॉन्स ऑफ सोलापूर हा पुरस्कार संस्थेस प्रदान करण्यात आला आहे.
हा पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील शून्यातून पुढे आलेल्या नामांकित संस्था व व्यक्तींना प्रदान करण्यात आलेला होता. मोहोळ तालुक्यातील नामांकित श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूल मोहोळ या संस्थेस महाराष्ट्र लोकसभा सदस्य धैर्यशील (भैय्या) मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते हा पुरस्कार संस्थेचे सचिव सुनील झाडे व सुकन्या झाडे यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे संचालक मोहित झाडे, सृष्टी झाडे, मिलन ढेपे, धरती पाटील उपस्थित होते. सर्व पालक व समाज यांच्याकडून संस्थेचे अभिनंदन होत आहे. या पुरस्कारामुळे संस्थेला व सर्व शिक्षकांना पुढील काम करण्यासाठी प्रेरणा मिळाली.



