गजानन बहुद्देशीय संस्था संचलित श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूल मोहोळ व श्रद्धा विद्या मंदिर मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष 2025 26 सांस्कृतिक महोत्सव झेप 3.0 उत्साहात साजरा झाला.
श्रद्धा शिक्षण संकुल येथे झेप 3.0 उत्सवात साजरा
गजानन बहुद्देशीय संस्था संचलित श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूल मोहोळ व श्रद्धा विद्या मंदिर मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने शैक्षणिक वर्ष 2025 26 सांस्कृतिक महोत्सव झेप 3.0 उत्साहात साजरा झाला.
या कार्यक्रमाप्रसंगी मोहोळ नगरपरिषदेच्या प्रथम महिला नगराध्यक्ष सिद्धताई वस्त्रे नगरसेवक दौलतराव देशमुख, सुशील क्षीरसागर, संस्थेचे सर्वे सर्वां गजानन झाडे सरस्वती झाडे संस्थापक सचिव सुनील झाडे, संतोष झाडे,संचालक मोहित झाडे, प्रथमेश झाडे, सानिका झाडे, सृष्टी झाडे, शाळा व्यवस्थापक मिलन ढेपे, धरती पाटील व पत्रकार बांधव उपस्थित होते. या कार्यक्रमामध्ये सामाजिक, धार्मिक, विनोदी, सांस्कृतिक, देशभक्तीपर कौटुंबिक अशा सर्व विषयांना स्पर्श करणाऱ्या गीतांनी सर्व प्रेक्षकांचे मन आनंदित केले. या कार्यक्रमाचे खास आकर्षण झाशीची राणी व छावा थीम हे ठरले. हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी विभागप्रमुख विद्या पवार मुख्याध्यापिका सरस्वती कबाडे एचओडी मोहिनी थोरात, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.