Sunday, October 12, 2025
Latest:
सोलापूर

शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मेळावा संपन्न🌑 प्रकल्पास वाढता विरोध🌑 1जुलैला धडक मोर्चा चे नियोजन

Spread the love

🌑 शक्तिपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मेळावा संपन्न
🌑 प्रकल्पास वाढता विरोध
🌑 1जुलैला धडक मोर्चा चे नियोजन
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, मोहोळ, मंगळवेढा, पंढरपूर,सांगोला या तालुक्यांमधून नागपूर ते गोवा हा शक्तिपीठ द्रुतगती मार्ग प्रस्तावित असून सदरच्या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्याविषयीची पावले सरकारकडून उचलली जात असताना सदर प्रकल्पाला विरोध वाढत असून मोहोळ येथील श्री.नागनाथ मंगल कार्यालय येथे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांच्या मेळावा पार पडला. यावेळी प्रचंड संख्येने बाधित शेतकरी उपस्थित होते.सदर मेळाव्यास शेतकरी कामगार पक्षाचे कै.आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू भाई डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.संग्राम चव्हाण यांच्या मार्गदर्शना खाली व भाई दिगंबर कांबळे यांच्या नेतृत्वाखाली सदरचा नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांचा मेळावा यशस्वीपणे पार पडला.यावेळी सदर प्रकल्पासाठी शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे असलेले एकमेव साधन म्हणजे त्यांची शेतजमीन असून जमिनी जबरदस्तीने संपादित केल्या तर शेतकरी उध्वस्त होईल म्हणून सदर प्रकल्पास एक इंच सुद्धा जमीन द्यायची नाही यावर एकमत झाले.याप्रसंगी बोलताना भाई दिगंबर कांबळे यांनी या प्रकल्पाबाबत आजपर्यंत प्रशासकीय पातळीवर प्रसिद्ध झालेल्या राजपत्र अध्यादेशाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.तर श्री. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नागपूर ते गोवा यादरम्यान सध्याचे प्रचलित नव्याने बांधलेले सहा पदरी महामार्ग अस्तित्वात असताना 85 हजार कोटी खर्चून नवा महामार्ग बांधण्याची गरजच काय? सरकारला कंत्राटदारांची घरे भरावयाची आहेत काय? असा सवाल खडा केला. जर जमिनी संपादित करावयाच्याच असतील तर शेतकऱ्याला जमीन व पिकांचा योग्य मोबदला म्हणजे प्रति एकर दोन कोटी रुपये कमीत कमी मिळावे या प्रमुख मागणीवर सर्वांचे एक मत झाले. याबरोबरच प्रकल्प ग्रस्तांना “प्रकल्पग्रस्त”म्हणून दाखला त्वरित मिळावा व त्यांना शासकीय नोकऱ्यांमध्ये त्वरीत आरक्षण मिळावे, महामार्गामुळे खंडित होणाऱ्या शेतकऱ्यां च्या सध्याअस्तित्वात असलेल्या रस्त्यां बाबत योग्य नियोजन व्हावे तसेच जमिनीच्या मोबदल्याबाबत शेतकऱ्यांसोबत खाजगी वाटाघाटीच्या माध्यमातून जमिनीचे बाजार भावाप्रमाणे योग्य मूल्य व पिकांचे पंचनामा मूल्य ठरवून त्याप्रमाणे नुकसान भरपाई जाहीर करावी या प्रमुख मागण्यांसह इतर 22 मागण्या करण्यात आल्या.महागाई, नैसर्गिक संकटे, हमीभावाचा अभाव यामुळे सर्व शेतकरी आधीच संकटात असून त्यांच्या जमिनी संपादित केल्या तर तो पूर्णतः उध्वस्त होईल म्हणून सरकारने त्यांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करावा तरच शेतकरी सदर प्रकल्पास जमिनी देतील अन्यथा शेतकरी त्याच्या शेतात पाऊल ठेवू देणार नाही असा इशारा सोलापूर जिल्हा किसान काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा. संग्राम चव्हाण यांनी याप्रसंगी बोलताना दिला.
यावेळी प्रचंड संख्येने उपस्थित असलेल्या बाधित शेतकऱ्यांशी आमच्या प्रतिनिधी संवाद साधला तेव्हा सदर प्रकल्पा बाबत शेतकऱ्यांच्या भावना तीव्र असल्याचे चित्र दिसले. या मेळाव्यास संपर्कप्रमुख शरद पवार,नगरसेवक सत्यवान गायकवाड श्री.दिनेश घागरे,श्री बाळासाहेब पवार, श्री.महेश बिले श्री. सागर बिले श्री. निलेश हागीर प्रभाकर केंगार गजानन पाटील राहुल जमदाडे, नागनाथ कापसे, विश्वास चव्हाण, भैय्यासाहेब चव्हाण, सुनील चव्हाण, अमोल पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *