विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आदरणीय खासदार मा. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आदरणीय खासदार मा. सुप्रियाताई सुळे यांची भेट घेतली. मोहोळ विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. नागनाथ भाऊ क्षीरसागर यांच्या माध्यमातून गेल्या २५ ते ३० वर्षापासून क्षीरसागर कुटुंबीय समाजकारण व राजकारणात सक्रिय आहेत. या सर्व गोष्टींचा विचार करून मोहोळ विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीसाठी इच्छुक असल्याबाबत त्यांना सांगितले.
अनगर येथील अप्पर तहसील कार्यालय संदर्भात मोहोळ तालुका बचाव संघर्ष समितीच्या वतीने जो लढा दिला होता, त्या संदर्भातही माहिती दिली. तसेच धनगर जमातीला एस.टी (ST) प्रवर्गातील आरक्षण मिळावे महाराष्ट्रभर जी आंदोलने होत आहेत त्या पार्श्वभूमीवर धनगर समाजासाठी अनुसूचित जमातीचे प्रमाणपत्रासाठी राज्यस्तरीय विशेष कमिटीचा सदस्य या नात्याने मा. सुप्रियाताई यांच्याशी चर्चा केली.