श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस जल्लोषात साजरा
श्रद्धा इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस जल्लोषात साजरा
मोहोळ येथे दि. २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एग्रीकल्चर विभाग मधील सायंटिस्ट स्वाती कदम हे लाभले. शाळा संचालक मोहित झाडे सीईओ सृष्टी झाडे या उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम व सी. व्ही रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी विज्ञान विषय शिक्षक विद्या माने, प्राजक्ता आरबळकर, सुजाता आहेर, प्रियांका सोंडगे तसलीम मुल्ला, अमृता बाबर, मीनाक्षी माने, विद्या पवार, यांना गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. या प्रदर्शनात अंधश्रद्धा निर्मूलन समिती, अधांतरी बाबा, बॉटल ब्रिक्स सोफा सेट, सायंटिफिक मॉडेल , पायथागोरस थेरम इ.
अनेक प्रयोगाचे प्रदर्शन भरविण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे स्वाती कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले व नॅशनल सायन्स डे आपण का साजरा करतो याचे महत्त्व विद्यार्थ्यांना सुजाता आहेर यांनी सांगितले. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या माने यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राजक्ता आरबळकर यांनी मानले. या कार्यक्रमाला संस्थापक सुनील झाडे ,व्यवस्थापक मिलन ढेपे ,व्यवस्थापिका धरती पाटील ,मुख्याध्यापिका वीणा कदम, शाळा विभाग प्रमुख प्राजक्ता आरबळकर,समन्वयक पोर्णिमा सुरवसे, रूपाली कोकाटे, मोहिनी थोरात ,मिशन होस्ट सलमान मुल्ला, सांस्कृतिक विभाग प्रमुख विद्या पवार हे उपस्थित होते. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन विद्या माने व सलमान मुल्ला यांनी अथक परिश्रम घेऊन केले. तसेच हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे योगदान लाभले.
