Thursday, January 15, 2026
Latest:
सोलापूर

तुकाराम बाबांनी घेतली जिल्हाधिकारी, सीईओची भेट★ युवा प्रशिक्षणार्थीच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावण्याची केली मागणी

Spread the love

तुकाराम बाबांनी घेतली जिल्हाधिकारी, सीईओची भेट
★ युवा प्रशिक्षणार्थीच्या मानधनाचा प्रश्न मार्गी लावण्याची केली मागणी

सांगली/ प्रतिनिधी:- मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी यांचे मार्गदर्शन सांगली जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या शिक्षण विभागाने युवा प्रशिक्षणार्थी यांना जी पाच महिन्यांचू मुदतवाढ मिळाली त्यात केलेल्या तांत्रिक चुकाचा फटका प्रशिक्षणार्थी यांना बसला आहे. चूक दुरुस्त व्हावी तसेच रखंडलेले मानधन द्यावे या मागणीसाठी युवा प्रशिक्षणार्थीच्या प्रश्नासाठी लढणारे, चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी जिल्हाधिकारी अशोक कुंभार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची भेट घेतली.
दोन्ही अधिकाऱ्यांनी बाबांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत तांत्रिक दुरुस्ती सुधारून घेवू व मानधन लवकरात लवकर मिळावे यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाही दिली.

सांगली येथील युवा प्रशिक्षणार्थी यांनी तुकाराम बाबा यांची भेट घेत जिल्हा परिषद शिक्षण विभागात तांत्रिक चुका केल्याने आमच्या कार्यकाळावर अन्याय झाल्याबाबत न्याय देण्याची विनंती केली होती. त्या विनंतीनुसार बाबांनी जिल्हाधिकारी अशोक कुंभार व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची भेट घेतली.
यावेळी युवा प्रशिक्षणार्थी यांनी जिल्हाधिकारी, सीईओ यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना अंतर्गत आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून कार्यरत आहोत होतो. योजनेच्या पहिल्या सहा महिन्यांनंतर आमच्या पुढील वाढीव पाच महिन्यांसाठी जिल्हा परिषद व कौशल्य विभाग, सांगली यांनी योग्य त्याप्रमाणे आदेश दिले नाहीत. त्यामुळे आमचा प्रशिक्षण कार्यकाळ नियमानुसार पूर्ण न होता अचानक संपला आणि व ते कोणत्याही प्रशिक्षणार्थीना कोणतीही पूर्व कल्पना न देता कार्यकाळ संपवण्यात आला. त्या कारणास्तव प्रशिक्षणार्थीना कल्पना नसल्याने त्यांचा गैरवापर आस्थापनाने करून घेतला. पुढील प्रशिक्षणाची किंवा अन्य लाभांची संधी मिळाली नाही.ही तांत्रिक चूक आमच्या नियंत्रणाबाहेर असून, यामुळे आम्हाला मोठा अन्याय झाला आहे, सर्व संबंधित कागदपत्रे वेळच्या वेळी सादर करूनही फक्त विभागीय प्रक्रियेत झालेल्या
प्रकारची स्वतंत्र चौकशी करुन दोषीवर आवश्यक ती कारवाई करावी. शिवाय, आमच्या प्रशिक्षण कार्यकाळाचा नुकसान भरपाई कालावधी मंजुर करावा व संबंधित लाभ मिळावेत अशी मागणी केली.
शिक्षण अधिकारी यांच्या 16/6/2025 च्या आदेशानुसार सर्व शिक्षण विभागातील तसेच जिल्ह्यातील इतर विभागातील प्रशिक्षणार्थ्यांना पुढील पाच महिन्यासाठी दिनांक 16/5/2025 ते 15/11/2025 वाढीव नेमणूक देण्यात आली होती पण काही प्रशिक्षणार्थ्यांना ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कार्यकाळ संपून कार्यमुक्त करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे तरी संबंधित प्रशिक्षणार्थ्यांना पाच महिन्याचा वाढीव कार्यकाळ ‌द्यावा अन्यथा पाच महिन्याचे पूर्ण मानधन देण्यात यावे, जिल्ह्यातील सर्व विभागातील युवा प्रशिक्षणाथ्यांच्या जून जुलै तसेच ऑगस्ट महिन्याचे मानधन मिळालेले नाही तरी संबंधित महिन्याचे मानधन लवकरात लवकर देण्यात यावे, 80 टक्के प्रशिक्षणाचा कार्यकाळ संपला अशी माहिती देऊन व 20 टक्के प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ चालू आहे ज्या प्रशिक्षणार्थ्यांचा अजून कार्यकाळ संपलेला नाही त्यांच्यासाठी जिओ फेसिंग तसेच ऑनलाईन बायोमेट्रिक हजेरी चालू करण्यात यावेत अशी सूचना वरिष्ठ डिपार्टमेंट कडून देण्यात आले आहे पण याची अंमलबजावणी संबंधित आस्थापनाने केलेली नाही यातून प्रशिक्षणार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी जिल्ह्यातील विविध विभागातील युवा प्रशिक्षणार्थ्यांची ऑनलाइन इंटर्न प्रोफाइल अपडेट होत नाही त्यामधील अपडेडेशन जसे आधार अपडेट डॉक्युमेंट अपडेट हे अपडेट करावेत अशी मागणी तुकाराम बाबा यांच्यासह प्रशिक्षणार्थी यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *