राज्यातील युवा प्रशिक्षणार्थीच्या मागण्यासाठी मुंबईत आज आझाद मैदानावर महामोर्चा★ हभप तुकाराम बाबा उतरणार महामोर्चात; पश्चिम महाराष्ट्राचे स्विकारले नेतृत्व★ जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना दिले निवेदन
फोटो
जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना निवेदन देताना हभप तुकाराम बाबा महाराज.
जत/प्रतिनिधी:- अध्यात्म, समाजकार्याबरोबरच म्हैसाळच्या पाण्यासाठी लढा उभारणारे चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती तथा श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज हे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतर्गत काम करणाऱ्या राज्यातील युवा प्रशिक्षणार्थीच्या मागण्यासाठी मैदानात उतरले आहेत. या संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे नेतृत्व तुकाराम बाबा करणार आहेत. मंगळवारी मुंबई येथील आझाद मैदानावर राज्यभरातील युवा प्रशिक्षणार्थींचा भव्य महामोर्चा अयोजिय करण्यात आला आहे. या महामोर्चात तुकाराम बाबा उतरणार आहेत.
सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना भेटून हभप तुकाराम बाबा महाराज यांनी निवेदन दिले आहे. यावेळी अमोघसिद्ध शेंडगे, जयदीप माने, सतीश काराजनगी, जकराया क्षीरसागर, गंगय्या स्वामी, भिमराव निगडे, चेतन भोसले, मारुती व्हनमराठे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात तुकाराम बाबा यांनी नमूद केले आहे की,मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण ही योजना राज्य पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरु केली आहे. या प्रशिक्षणा अंतर्गत सर्व प्रशिक्षणार्थी म्पंचायत समीती कार्यालय, ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र विभागामध्ये ऑपरेटर, ए.एस.एम नर्स पदावर काम करत आहेत. या योजनामुळे सांगली जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी मिळाली आहे. सहा महिन्याचे प्रशिक्षणा पूर्ण केल्यानतर इच्छुक उमेदवार ज्या ठिकाणी काम करत असतील त्याना तिथेच कायमस्वरूपी नौकरी, रोजगार मिळेत असे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्यानुसार या प्रशिक्षणार्थी न्याय द्यावा,बप्रशिक्षणानंतर कायम रोजगार देण्यात यावा, विद्या वेतनमध्ये वाढ करण्यात यावी, विद्यावेतन नियमीत व वेळेवर देण्यात यावी, युवा प्रशिक्षरार्थीना शासकीय सेवेत १०% आरक्षण देण्यात यावे, शासकीय कर्मचारी प्रमाणे रजा अनुज्ञेय असावी असे नमूद केले आहे.
