संखमधील श्री संत बागडेबाबा मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन
संखमधील श्री संत बागडेबाबा मंदिरात विविध कार्यक्रमाचे आयोजन
★ हरिनाम सप्ताहास सुरुवात; तुकाराम बाबा यांची माहिती
बागडेबाबा मंदिर फोटो
जत/प्रतिनिधी:- जत तालुक्यातील संख (गोंधळेवाडी) येथील श्री संत बागडेबाबा मंदिरात २१ मे पर्यत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प.पु. सिध्देश्वर महास्वामीजी विजयपूर आश्रम यांनी बाबा आश्रम संख येथे लावलेले वृक्ष याचे स्मरण दिन व श्री संत सयाजी बागडेबाबा यांचे मंदिर द्वितीय वर्धापन दिन सोहळयानिमित्य अखंड हरिनाम सप्ताह व विविध धार्मिक कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती, श्री संत बागडेबाबा मानव मित्र संघटनेचे सर्वेसर्वा हभप तुकाराम बाबा महाराज यांनी दिली.
हभप तुकाराम बाबा महाराज यांनी राष्ट्रीय संत गाडगेबाबा यांचे शिष्य, वैराग्यसंपन्न श्री संत सयाजी बागडेबाबा यांचे भव्य व देखणे मंदिर संख ( गोंधळेवाडी) येथे उभारले आहे. तुकाराम बाबा यांनी स्वप्नातील हे मंदिर उभारले आहे.
१५ मे रोजी मुंबई येथील सोमनाथ काटे महाराज, युवराज शिंदे महाराज, जंगली महाराज यांच्या कीर्तन व भजनाने झाली आहे. १६ मे रोजी प्रसिद्ध वास्तुविशारद तज्ञ सरिता लिंगायतताई महाराज, शिवराया महाराज, श्रीशैल कुंभार, १७ मे रोजी रामकृष्ण बागडेबाबा महाराज, भारत खांडेकर महाराज, नामदेव खैरावकर महाराज, बंडोपंत महाराज, १८ मे रोजी नामदेव कारंडे महाराज, शारदाताई महाराज, सुधीर महाराज, सुवर्णा राठोळ महाराज, १९ मे रोजी शिवराया महाराज, पात्रे महाराज, शाहीर हेगडे महाराज, बाळू खडतरे महाराज, २० मे रोजी एकनाथ महाराज पंढरपूर, अमृत पाटील महाराज, कनूर महाराज, तर २१ मे रोजी सकाळी अकरा वाजता पंढरपूर येथील एकनाथ महाराज यांचे काल्याचे कीर्तन, फुले व गुलालाची उधळण होणार आहे. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
१५ ते २१ मे दरम्यान आयोजित कार्यक्रम हभप तुकाराम बाबा महाराज व जाल्याळ येथील अमृत पाटील महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडत आहे. यावेळी रामलिंग मेडीदार, शिवराया हतळी, मलण्णा हतळी, राजू चौगुले, महेश भोसले, संतोष येळेकर, श्रीशैल कुंभार, सिद्र्य्या मोरे, चनाप्पा आवटी, पिंटू मोरे, व्यंकटेश दुबे, श्रीपाद लिंगायत, बसू बागाळी, सलीम अपराद, प्रेम भोसले, शिवगौंडा भोसले, सुवर्णा राठोळ, विठाबाई भोसले, आर्या लिंगायत, सावली राठोळ आदी उपस्थित होते.




