पालकमंत्री ना.श्री.जयकुमार गोरेसाहेब यांच्या उपस्थितीत पंढरपूरातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात आषाढी वारीच्या पूर्वतयारीची बैठक आज पार पडली..
📍पंढरपूर | आषाढी वारीची पूर्वतयारी..
पालकमंत्री ना.श्री.जयकुमार गोरेसाहेब यांच्या उपस्थितीत पंढरपूरातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या सभागृहात आषाढी वारीच्या पूर्वतयारीची बैठक आज पार पडली..
बैठकीत, आषाढी यात्रेसाठी सर्व संताच्या पालख्याचे नियोजन, पाणी पुरवठा, विजपुरवठा, पार्किंग, रस्ते, पालखी मार्ग, वारकरी तळ, पोलीस बंदोबस्त, ठिकाणांचे फलक अशा विविध मागण्यांची पूर्तता करावी तसेच या काळात लाखो भाविक पंढरपुरात दर्शनाला येतात त्यांची गैरसोय होऊ नये,असे सांगितले.
यावेळी माढ्याचे खासदार श्री.धैर्यशील मोहिते-पाटील, पंढरपूर मंगळवेढ्याचे आमदार श्री.समाधान आवताडे, जिल्हाधिकारी श्री.कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.कुलदीप जंगम, जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.अतुल कुलकर्णी, विभागीय आयुक्त कार्यालयाचे अपर आयुक्त श्री.तुषार ठोंबरे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.संदीप कोहिनकर, जिल्हा नियोजन अधिकारी श्री.दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता श्री.संजय माळी, प्रांताधिकारी श्री.सचिन इथापे, मंदिर समितीचे व्यवस्थापक श्री.मनोज श्रोती यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
Jaykumar Gore
Dhairyasheel Mohite Patil
Samadhan Autade – आमदार समाधान आवताडे
