8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधून विद्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला.
8 मार्च महिला दिनाचे औचित्य साधून विद्यालयात महिला दिन साजरा करण्यात आला.
लोकनेते बाबुराव (अण्णा )पाटील विद्यालय औढी येथे जागतिक महिला दिन निमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुलींचा सांस्कृतिक कार्यक्रम व महिलांचा उखाणे घेणे इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ रेश्मा भुसे व प्रमुख सौ सौ पाहुणे लक्ष्मी कोळी (ग्रामपंचायत सदस्य) यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत संस्थेच्या सचिव व भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ. अर्चना पांडुरंग बचुटे मॅडम यांनी गुलाब पुष्प देऊन केले.
महिला दिना निमित्ताने विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. मुक नाट्य सादर केले. महिला माता पालक यांच्यासाठी उखाणा स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये प्रथम क्रमांक शुभांगी अरुण पांढरे. द्वितीय क्रमांक प्रियंका संभाजी पवार. तृतीय क्रमांक सौ रेश्मा गुणवंत भुसे . यांचा आला. विजेत्यास बक्षीस वितरण समारंभ उपस्थितीत माता पालक यांच्या शुभहस्ते देण्यात आले. संस्थेच्या सचिव व भाजपा महिला मोर्चा तालुकाध्यक्ष सौ अर्चना पांडुरंग बचुटे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी यांनी केले.


