मौजे यावली (ता. मोहोळ) येथील लोकनियुक्त सरपंच सौ वर्षा सिद्धेश्वर राऊत यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव मंजूर झाला
मौजे यावली (ता. मोहोळ) येथील लोकनियुक्त सरपंच सौ वर्षा सिद्धेश्वर राऊत यांच्याविरुद्ध ग्रामपंचायत सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव मंजूर झाला असून त्यांचे सरपंच पद गेले आहे.लोकनियुक्त सरपंचावर अविश्वास आणण्याची ही बहुधा मोहोळ तालुक्यातील पहिलीच वेळ असल्याची चर्चा आहे. सरपंच सौ वर्षा राऊत यांच्या विषयी गावामध्ये अनेक तक्रारी वाढल्या होत्या विशेष करून त्यांना निवडून येण्यात मदत करण्यात आलेल्या कार्यकर्त्यांनाही त्या विश्वासात घेत नसल्याची चर्चा होती.यामुळे त्यांच्यावर अविश्वास आणण्याच्या हालचाली गेली सहा महिने सुरू होत्या.
त्यानुसार अध्यासिअधिकारी. म्हणून तहसीलदारसचिन मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायतीची सभा दि. ११ जुलै २०२५ रोजी पार पडली. त्यामध्ये सरपंच विरुद्ध ११ सदस्य व सरपंच बाजूने ० मतदान होऊन पारित झालेला ठराव प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याकडे पाठवण्यात आला . त्यानंतर लगेच जिल्हाधिकारी सोलापूर याचे आदेशानुसार विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. त्याचे अध्यासिअधिकारी म्हणून मोहोळ पंचायत समितीचे गट विकास अधिकारी विवेक जमदाडे यांची नियुक्ती होऊन लोकनियूक्त सरपंच यांच्यावर दाखल झालेल्या अविश्वास ठरावा बाबत विशेष ग्रामसभा दि २२ जुलै रोजी घेणेत आली . यावेळी यावली गावचे एकूण मतदार ३११२ पैकी ५२५ मतदार सभासद उपस्थित होते . मतदारांची शिरगणतीनुसार मतदान प्रक्रिया पार पडली .सरपंच यांचे बाजूने ३७ व सरपंच यांचे विरुद्ध ४८८ असा सरपंच यांचे वरील अविश्वास ठराव मंजूर झाला . या प्रक्रिये वेळी सचिव म्हणून ग्रामसेविका प्रियांका केवळे यांनी काम पाहिले तर सहाय्यक गट विकास अधिकारी गटविकास अधिकारी व्ही .आर देशमुख विस्तार अधिकारी नागसेन कांबळे , सचिन कदम व इतर ग्रामपंचायत अधिकारी मोहोळ आणि पोलीस स्टेशनचे किरण पाटील व इतर स्टाफ उपस्थित होते.