रसिक प्रेक्षकांच्या मनात दाटून आले मेघ, श्रद्धा संकुलाचा जल्लोषात झेप 2023 – 2024
रसिक प्रेक्षकांच्या मनात दाटून आले मेघ, श्रद्धा संकुलाचा जल्लोषात झेप 2023 – 2024
गजानन बहुउद्देशीय संस्था संचलित श्रद्धा इंग्लिश मिडीयम स्कूल व श्रध्दा विद्यामंदिर स्कूल मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्यदिव्य,नेत्रदीपक,रोमहर्षक आणि प्रत्येक रसिक श्रोत्यांच्या मनात, आठवणीत राहणारा श्रद्धा संकुलाच्या बालचिमुकल्यांचा कलाविष्कार मोठ्या दिमाखात व उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून सोलापूर ग्रामीण उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर उपस्थित होते. व्यासपीठावर प्रमुख मान्यवर गजानन झाडे, सरस्वती झाडे, मोहित झाडे, संतोष झाडे,मिलन ढेपे, मोहोळ तालुका पत्रकार संघाचे सर्व पत्रकार, संस्थेचे संस्थापक सचिव सुनिल झाडे उपस्थित होते.
बालकरांच्या कलाविष्कारराला पालकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कलाविष्कारामध्ये देशभक्तीपर, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, कौटुंबिक,शूर – वीरता, प्रेम, विनोदी मनोरंजनात्मक अशा सर्व कलागुणांना स्पर्श करून रसिक प्रेक्षकांची मने जिंकून टाळ्यांचा प्रचंड उस्फूर्त प्रतिसाद बालचिमुकल्यांनी मिळवला. या कार्यक्रमाचे खास आकर्षण “रामायण, विठू माऊली, छत्रपती शिवाजी महाराज” या गीतांवरील कलाकृती ठरली. हे पाहताना “रसिक प्रेक्षकांच्या मनात दाटून आले मेघ,श्रध्दा संकुलाची यशस्वी,जल्लोषात संपन्न झाली कलाविष्काराची झेप.”
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापक , धरती पाटील दोन्ही प्रशालेचे मुख्याध्यापक दिनेश नरळे, वीणा कदम पर्यवेक्षिका पौर्णिमा सुरवसे, मोहिनी थोरात सांस्कृतिक विभाग प्रमुख विद्या पवार, सविता पाटोळे, तृप्ती कदम, पल्लवी गोडसे, सुशील आवताडे दोन्ही प्रशालेचे सर्व शिक्षक व शिक्षकत्तेर कर्मचारी वृंद यांचे मोलाचे योगदान लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रमोद कोरे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल संस्थेचे सचिव सुनिल झाडे सर यांनी सर्वांचे अभिनंदन व कौतुक केले.



